कोकण

महायुतीच्या प्रचारात घटक पक्षांची साथ

CD

३२ (निवडणूक पानासाठी)

महायुतीचा प्रचारात घटक पक्षांची साथ

रायगड-रत्नागिरी मतदार संघ; आजी-माजी आमदार सेनापतीच्या भुमिकेत

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १८ : रायगड लोकसभा मतदार संघातील रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांची जबाबदारी एक आमदार, एक माजी आमदार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यांच्या मदतीला दोन नेते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. लोकसभा निवडणुकीकडे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात असल्यामुळे विद्यमान आमदार आणि इच्छुक कामाला लागलेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर असे दोन विधानसभा मतदार संघ रायगड लोकसभा क्षेत्राला जोडलेले आहेत. गुहागर विधानसभा क्षेत्रात चिपळूण तालुक्यातील ९२ मतदान केंद्र तर खेड तालुक्यातील ९० मतदान केंद्र येतात. या विधानसभा क्षेत्रातील प्रचाराची जबाबदारी माजी आमदार आणि भाजपचे गुहागर विधानसभा प्रमुख डॉ. विनय नातू यांनी स्वीकारली आहे. लोकसभेच्या निवडणुकीकडे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहा, असे डॉ. नातू यांना आवाहन केले आहे. लोकसभा जाहीर होण्याआधी संघटनात्मक रचना भाजपने पूर्ण केली होती. पक्षाचा आणि नंतर महायुतीचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना सक्रिय केले. या विधानसभा क्षेत्रातील वहाळ, मूर्तवडे, कापसाळ, कामथे, वीर, कोकरे, नायशी या परिसरात शिंदे सेनेचे शरद शिगवण आणि चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांचाही संपर्क आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून प्रचाराचे नियोजन सुरू आहे. खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी लक्ष घातले आहे. खेड, दापोली, मंडणगड विधानसभा क्षेत्रात आमदार योगेश कदम यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे.
माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाचे बळ वाढले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही मतदार संघातील कुणबी समाजातील मातब्बर पदाधिकाऱ्यांना मागील टर्ममध्ये राष्ट्रवादीत घेतले होते. त्यांच्यावर कुणबी समाजातील बैठकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात या समाजात जाणीवपूर्वक केलेले काम आणि वाढवलेला संपर्क याचा फायदा उचलण्यासाठी स्वतंत्र रणनीती तटकरे यांनी आखली आहे. लोकसभेची उमेदवारी घोषित होण्यापूर्वी भाजपमध्ये स्वपक्षाचा उमेदवार हवा म्हणून जोरदार तयारी सुरू होती. शेकापमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी संपूर्ण मतदार संघात बैठका घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT