कोकण

महायुतीत प्रचारपत्रकांवरून द्वंद्व

CD

११ (निवडणुक पानासाठी)

महायुतीत प्रचारपत्रकांवरून द्वंद्व

तत्काळ दिलजमाई; महाविकास आघाडी खळाबैठकांवर भर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगतदार लढत असली तरीही रत्नागिरीत सध्या महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिंदे शिवसेनेत प्रचारामध्येच पत्रकावरून द्वंद्व रंगले. बाळासाहेब ठाकरे आणि अनंत दिघे यांचे प्रचारपत्रकावर फोटोच नसल्यामुळे शिंदे शिवसैनिकांनी थांबण्याची घेतलेली भूमिका काहीकाळ अडचणीची ठरते की काय, अशी स्थिती होती; पण तत्काळ प्रचारपत्रकच बदलून त्यावर पांघरूण घालण्यात आले. त्यामुळे महायुतीच्या प्रचारातील दुरावा सर्वांपुढे आला आहे.
महायुतीचा उमेदवार उशिरा जाहीर झाला तरीही प्रचार जोमाने सुरू झाला आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक प्रचारात सक्रिय होत आहेत; पण कुठेतरी माशी शिंकतेच. तसंच काहीसं महायुतीच्या प्रचारात घडत आहे. महायुतीत गोंधळ उडत असतानाच महाविकास आघाडी सुस्साट चालली आहे. त्यांचे उमेदवार विनायक राऊत सभा, खळाबैठकांचा सपाटा लावत आहेत. महायुतीत शिवसेना-भाजपमध्ये या मतदार संघावरील दावा आणि उमेदवारीवरून प्रचंड ताणाताणी झाली. शिवसेनेचा हा पारंपरिक मतदार संघ असला तरी महायुती म्हणून भाजपला राज्यात कुठेतरी जागा सोडणे हे शिवसेनेला क्रमप्राप्त होते; परंतु ती वेळ या मतदार संघावर येईल असे वाटत नव्हते. एकीकडे भाजप आपला दावा सोडायला तयार नव्हता तर दुसरीकडे शिवसेना आपला हक्क सोडायला तयार नाही. दोघांच्या चढाओढीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्ते बुचकळ्यात पडलेले. १८ एप्रिलला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुक किरण सामंत यांना माघार घ्यावी लागली आणि हक्काची जागाही गेली. त्याची सल शिवसैनिकांना अजूनही आहेच. मनोमिलनासाठी महायुतीची समझोता बैठकही झाली. शिवसेना, भाजप, मनसे, आठवले गट आदींनी प्रचाराला सुरवात केली; पण प्रचारपत्रकावरील शिवसेनेचे पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो वगळल्याने त्यात खंड पडला. त्यातून प्रचारात व्यत्ययही आला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यावर तातडीने तोडगा काढत भाजपने दिलजमाई घडवून आणली; परंतु या निमित्ताने महायुतीत सर्वकाही आलबेल नाही, हे चव्हाट्यावर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT