कोकण

अर्जुना नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू

CD

८ (टूडे पान १ साठी, सेकंड मेन)

- rat२५p१३.jpg ः
OP२४M७९७२६
राजापूर ः अर्जुना नदीपात्रामध्ये गाळ उपशाचे सुरू असलेले काम.

अर्जुना नदीतील गाळ काढण्यास प्रारंभ

राजापूरवासियांना दिलासा; पात्रात १.५५ लक्ष घनमीटर शिल्लक प्रमाण

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः नाम फाउंडेशन, नगरपालिका आणि लोकसहभागातून अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा गतवर्षी करण्यात आला; मात्र अर्जुना नदीवरील मोठा पूल ते कोंढेतड पूल या भागामध्ये सुमारे १.५५ लक्ष घनमीटर गाळ शिल्लक राहिल्याने पुराची टांगती तलवार होती. त्यासाठी शिल्लक गाळ उपसा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात राजापूर शहरातील पूरपरिस्थितीवर मात करता येणार आहे.
राजापूर शहराला अनेक वर्षांपासून पूरसमस्येला सामोरे जावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून गतवर्षी अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्यात आला. या उपशासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार घेतला होता. त्यांना लोकसहभागातून मोठी मदत झाली. लोकवर्गणीतून उभारलेला लाखो रुपयांचा निधी आणि जिल्हा नियोजनमधून उपलब्ध निधी यामधून गाळ काढण्यात आला. या उपशामुळे पावसाळ्यात शहरातील पुराची तीव्रता कमी झाली होती. त्यामुळे भविष्यात पुराचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी अर्जुना नदीपात्रातील उर्वरित गाळाचा उपसा व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार गतवर्षी शिल्लक राहिलेल्या निधीतून यंदा अर्जुना नदीवरील मोठा पूल ते कोंढेतड पूल या दरम्यान गाळाचा उपसा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू आहे. त्या माध्यमातून नदीपात्रातील होणाऱ्‍या गाळउपशामुळे राजापूर शहरावरील वर्षानुवर्षाच्या पुराची तीव्रता कमी होणार आहे.

------
दृष्टीक्षेपात ः

* ‘अर्जुना-कोदवली’तील गाळामुळे राजापूरला पुराचा वेढा
* नाम फाउंडेशन आणि लोकसहभागातून गतवर्षी गाळ उपसा
* नदीपात्रातील ३.२० लक्ष घनमीटरपैकी १.६५ लक्ष घनमीटर गाळ उपसा
* गाळ उपशाने पुराची तीव्रता होणार कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT