कोकण

घरगुती गॅस सिलेंडरसाठी मालवणात ग्राहकांच्या रांगा

CD

swt2510.jpg
79790
मालवण ः गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

घरगुती गॅस सिलेंडरसाठी
मालवणात ग्राहकांच्या रांगा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : एका कंपनीकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे तालुक्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तालुक्यात दिवसाला ९०० सिलेंडरची मागणी असताना केवळ २७० सिलेंडर उपलब्ध होत असल्याने गॅस सिलेंडरसाठी सध्या ग्राहकांच्या लांबच रांगा लागत आहेत. शहरात बांगीवाडा या ठिकाणी गॅस सिलेंडर वितरित केला जातो. गॅस सिलेंडरसाठी आज सकाळी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतूक कोंडीही झाली. वाहतूक पोलिस गुरुप्रसाद परब, धोंडू जानकर हे त्याठिकाणी दाखल झाले होते.
मालवणात एक कंपनीमधून गॅस सिलेंडर भरणा करून येतात, त्या कंपनीचा प्लांट चाकण येथे आहे; मात्र ते अंतर लांब होत असल्याने बेळगाव येथील प्लांटमधून गॅस सिलेंडर पुरवठा सुरू करण्यात आला. हे अंतर जवळ असल्याने लवकरात लवकर ग्राहकांना सेवा मिळावी, या हेतूने हा निर्णय झाला; मात्र बेळगाव येथून महाराष्ट्र सिंधुदुर्ग येथे गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या अधिक गाड्यासाठी निघालेले टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने काही गाड्या अजून सेवेत नाहीत. त्यामुळे गॅस सिलेंडर पुरवठा कमी होत आहे.
याबाबत कंपनीच्या मालवण कार्यालयातील व्यवस्थापकांनी सांगितले की. या समस्येवर पर्याय म्हणून चाकण येथील प्लांटमधूनही गॅस सिंलेंडर मागविले आहेत. सद्यस्थितीत ग्राहकांची मागणीही जास्त असल्याने काहीसा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जादा गॅस सिलेंडर मागणी केली आहे. येत्या दोन ते चार दिवसांत सेवा सुरळीत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT