कोकण

रेशन दुकानदारांना फोरजी ई-पॉस मशिन

CD

५ (पान ४ साठी, मेन)


- rat२५p१४.jpg ः
२४M७९७२७
राजापूर ः रास्त धान्य दुकानदारांकडे ई-पॉस मशिन सुपूर्द करताना पुरवठा विभाग.

रेशन दुकानदारांना ‘फोरजी ई-पॉस’ मशिन

तांत्रिक त्रुटी होणार दूर ; चार्जिंगची अद्यावत सुविधा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः रेशन दुकानदारांना जुन्या २-जी ई-पॉस मशिनमधील तांत्रिक त्रुटींमुळे धान्य वितरणात अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने रेशन दुकानदारांना फोरजी ई-पॉस मशिन उपलब्ध करून दिली आहेत. पुरवठा विभागाकडून तालुक्यातील रेशन दुकानदारांना नुकतेच या नव्या मशिनचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार, गैरव्यवहार थांबवण्यासाठी, लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्यवाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण झाले आहे. लाभार्थ्यांची ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलातही आणला गेला. त्यानुसार गेली पाच वर्षे संगणकीय वितरण प्रणालीद्वारे ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरण सुरू झाले. रेशनवरील धान्य वितरणात ई-पॉस मशिन महत्वाची यंत्रणा आहे. ई-पॉस मशिनवर धान्य वितरण करताना योजनानिहाय शिधापत्रिकाधारकांचे थम्ब घ्यावे लागतात. तांत्रिक अडचणीमुळे लवकर थम्ब इम्प्रेशन होत नसल्याने एका शिधापत्रिकाधारकाला त्यासाठी सुमारे १५ ते २० मिनिटे वेळ द्यावा लागतो. जुन्या टूजी ई-पॉस मशिनमधील या त्रुटींमुळे धान्यवितरण प्रणाली विस्कळित झाली होती तसेच अनेक ई-पॉस मशिनमधील सीमकार्ड निरूपयोगी झाल्यामुळे रेशन दुकानदार आपल्या मोबाईलद्वारे हॉटस्पॉट वापरून धान्य वितरण करत होते. गर्दीवेळी मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे रेशन दुकानदारांना शिधावाटप करताना लोकांच्या रोषाला सामोरे जाव लागत होते. या साऱ्‍याची दखल घेऊन शासनातर्फे ४जी प्रकारातील ई-पॉस मशिन पुरवठा विभागाला उपलब्ध झाली आहेत. या मशिनमध्ये दोन सीमकार्ड बसणार असून, मशिनलाच चार्जिंगची सुविधा आहे. त्यांच्या जोडीला वायफायची सुविधा उपलब्ध आहे. सध्याच्या मशिनपेक्षा नवीन मशिन आकाराने मोठे आहे. अत्याधुनिक यंत्रणेमुळे नागरिकांना धान्य घेण्यासाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या अत्याधुनिक ई-पॉस मशिनचे तालुक्यातील दुकानदारांना नुकतेच वाटप करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने दुकानदार उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT