कोकण

स्थानिक एसआयएलसी

CD

लोगो


कृतीतून शिका व्यावसायिक चटणी
सांगली येथे विशेष एक दिवसीय प्रशिक्षण
सांगली, ता. २५ : जीवनातील चव वाढविणारे खमंग स्वादिष्ट आणि रुचकर अशा विविध पद्धतीच्या व्यावसायिक चटणी प्रशिक्षण ३० एप्रिल रोजी सांगली येथील सकाळ कार्यालयात आयोजिला आहे. महाराष्ट्रीयन जेवणामध्ये चटणी या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दररोजच्या आहारामध्ये चटण्यांचे सेवन केल्यामुळे त्यांचे आपल्या शरीराला बऱ्याचशा प्रमाणात मोठे फायदे होतात. या अनुषंगाने व्यावसायिक चटणी प्रशिक्षणामध्ये विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण चटण्या शिकवल्या जाणार आहेत. हे प्रशिक्षण पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून शिकवले जाणार आहे. त्याचप्रमाणे चटणी व्यवसाय कमी भांडवलामध्ये कसा सुरु करावा, व्यवसायाला असणारी मागणी, त्यामधील नाविन्यपूर्ण पद्धती व्यवसायामध्ये मिळणारा नफा याचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे चटणी टिकवण्याची पद्धत व पॅकिंग याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मसाला क्वीन म्हणून ज्यांची ओळख आहे अश्या प्रसिद्ध अन्न प्रक्रिया प्रशिक्षक गंधाली दिंडे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशिक्षणामध्ये काय काय शिकण्यास मिळणार
सोलापुरी शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, लसूण चटणी, कढीपत्ता चटणी, कारले चटणी, टोमॅटो चटणी, कांदा चटणी, पांचाली चटणी, थ्री इन वन चटणी, आवळा चटणी, कोर्टा चटणी, जवस चटणी

ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिव पॅव्हेलियन, राम मंदिर चौक, सांगली
कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : ९३५६९७३४२७.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT