कोकण

आयुर्वेदिक चिकित्सा, उपचार लाभदायी

CD

swt296.jpg
80504
असनियेः आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना डॉ. प्रशांत ससाणे. सोबत रेश्मा सावंत, साक्षी सावंत, पांडुरंग धुरी, डॉ. योगेश शिंदे व अन्य मान्यवर.

आयुर्वेदिक चिकित्सा, उपचार लाभदायी
डॉ. प्रशांत ससाणेः असनियेत ग्रामपंचायतीतर्फे आरोग्य शिबिर
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २९ः ‘अखिल भारतीय आयुर्वेद’ हे आयुर्वेदिक क्षेत्रातील चांगले संस्थान आहे. येथे आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टर घडविले जातात. एकूण १४ विभागांमार्फत रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊ नये, यासाठी काम केले जाते. आयुर्वेद ही चिकित्सा नाही, तर ती जीवन जगण्याची शैली आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी या संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन धारगळ (गोवा) येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ. प्रशांत ससाणे यांनी केले.
गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, असनिये ग्रामपंचायत आणि शिवतेज मंडळ यांच्यावतीने असनिये प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. ससाणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर असनिये सरपंच रेश्मा सावंत, उपसरपंच साक्षी सावंत, माजी सैनिक पांडुरंग धुरी, गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉ. योगेश शिंदे, डॉ. थ्रीजिल के., डॉ. सायली कासार, डॉ. अपर्णा सिद्धे, माजी सरपंच एम. डी. सावंत, पोलिसपाटील विनायक कोळापटे, ग्रामसेवक मुकुंद परब, शिवतेज मंडळाचे अध्यक्ष दिनेश सावंत, सचिव प्रशांत ठिकार, समीर कोलते, शरद सावंत, संजय सावंत, आनंद सावंत, सचिन कोलते, अखिल भारतीय संस्थानचे सुमा नाईक, शांती सावंत, गिरीश नाईक, रजत नाईक, प्रमोद सावंत, सागर धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी मुकुंद परब यांनी, आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार हे शाश्वत उपचार असून, सर्वांसाठी एक देणगीच आहे, असे सांगितले. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आयुर्वेदाचे तज्ज्ञ डॉक्टर घडविण्यासह आयुर्वेदाचा प्रसार व प्रचारासह राबवित असलेल्या आरोग्य विषयक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. संस्थानच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, अॅलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, घसा, थायरॉईड, बालरोग, पचन, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उत्कृष्ट नियोजन असनिये ग्रामपंचायत आणि शिवतेज मित्रमंडळ यांनी केले. त्यामुळे या शिबिराला उत्स्फूर्त लाभला. असनिये प्राथमिक शाळेत घेतलेल्या या शिबिरात असनियेसारख्या ग्रामीण गावातील १६५ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात आली. प्रास्ताविक समीर कोलते, सूत्रसंचालन प्रितेश ठिकार यांनी केले. आभार ग्रामसेवक मुकुंद परब यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT