कोकण

मारुती मंदिर, मांडवी बीच येथे मतदार जनजागृती

CD

३० (पान ३ साठी)


- rat२९p३०.jpg-
२४M८०५७६
रत्नागिरी- शहरातील मारुती मंदिर येथे मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य आयोजित केले.
-----------

मारुती मंदिर, मांडवी बीच येथे मतदार जनजागृती

पालिका प्रशासनाचा पुढाकार ; आधी मतदान नंतर इतर काम करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी रत्नागिरी पालिका क्षेत्रामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती सुरू करण्यात आली आहे. शहरातील मारुती मंदिर आणि मांडवी बीच येथे मतदार जनजागृती आयोजन करण्यात आली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये नागरिकांनी १०० टक्के मतदान करावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तथा लोकसभा निवडणूक २०२४ स्वीप टीमचे जिल्हा सहाय्यक नोडल अधिकारी (शहरी) तुषार बाबर यांनी स्वीप जनजागृती मोहिम राबविली. त्या अंतर्गत मतदानाच्या जनजागृतीसाठी शुक्रवारी (ता. २६) मारुती मंदिर आणि मांडवी बीच रत्नागिरी येथे पथनाटयाचे आयोजन केले होते. या पथनाट्यामध्ये १८ वर्षांवरील व मतदार यादीमध्ये नोंद असलेल्या नागरिकांनी मतदान करावे. तसेच दिव्यांग नागरिकांना मतदानासाठी घरपोच वाहन सुविधा व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी होम पोस्टल मतदानासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी ७ मे रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात आपल्या आवडीच्या उमेदवाराला आधी मतदान नंतर इतर काम करा, असे आवाहन करण्यात आले. या पथनाट्याला नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT