कोकण

कसली सहानुभूती, ते लंगडे पांगळे आहेत का0

CD

३३ ( पान ३ साठी )


हिंदुत्व मुख्यमंत्रीपदासाठी गहाण ठेवले

नारायण राणे ः उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : संविधानाबाबत महाविकास आघाडी चुकीचा प्रचार करत आहे. कोणतेही संविधान आम्ही बदलणार नाही आणि राहिला सहानुभूतीचा विषय. ठाकरेंना कसली सहानुभूती? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वासाठी आयुष्य वेचले तेच हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी गहाण ठेवून गद्दारी केली, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केला.
कोकणात येणाऱ्या सर्व प्रकल्पांना विरोध करून ठाकरे सेनेने तरुणांचा रोजगार थांबवला, असाही आरोप त्यांनी केला. राणे म्हणाले, भारत देश तरुणांचा देश आहे. देशाच्या लोकसंख्येपैकी ४० टक्केपेक्षा जास्त तरुण आहेत. त्यामुळे देशाची प्रगतीची क्रांती व्हायला हवी. गेल्या १० वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था ११ नंबरला होती. मोदींनी १० वर्षांमध्ये देशाची एवढी चांगली प्रगती केली की, अर्थव्यवस्था आता ५ व्या क्रमंकावर आहे. उद्योगजगतामध्ये क्रांती होऊन २०३० ला ती ३ क्रमांकावर येईल. युवकांनी उद्योग व्यवसायामध्ये उतरण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकार मार्गदर्शन करत आहे. केंद्राच्या लघु व सुक्ष्म मंत्रालयाचे ८ कोटी उद्योग आहेत. त्यामुळे युवकांनी विचार करायला हवा. देशाच्या जीडीपीमध्ये ३० टक्के हातभार हा केंद्रीय लघु व सुक्ष्म मंत्रालयाचा आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक करणार म्हणजे करणारच.या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे शहराध्यक्ष बिपिन बंदरकर, भाजपचे शहराध्यक्ष राजन फाळके, तुषार साळवी, केतन शेट्ये आदी युवक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
---------------
...यांना तुम्ही मदत करणार का?

मुंबई-गोवा महामार्गाचे काम का रखडले? राऊत यांनी ठेकेदारांकडून २० कोटी मागितले; परंतु सिंधुदुर्गमध्ये हे आम्ही चालू दिले नाही म्हणून तेथील महामार्ग पूर्ण झाला. कोकणात येणाऱ्या सर्व प्रकल्पांना विरोध करून ठाकरे सेनेने तरुणांचा रोजगार थांबवला. त्यांना तुम्ही मदत करणार का?असा सवाल राणेंनी युवकांना विचारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT