कोकण

जिल्ह्यातील दहा शाळांना लॅपटॉप वितरण

CD

पा न२


जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणतर्फे
दहा शाळांना लॅपटॉप वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : पुण्यातील स्मार्ट कार्गो कंपनीच्या सहकार्याने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत जिल्ह्यातील दहा शाळांना लॅपटॉप वितरण करण्यात आले.
जिल्ह्यात २६ ऑक्टोबर २०२० च्या शासन निर्णयानुसार दहा आदर्श शाळा विकसित केल्या आहेत. या शाळांचे नामकरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा असे करण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता अनुपमा तावशिकर यांनी स्मार्ट कार्गो कंपनीशी संपर्क साधून या शाळांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात महत्त्‍वाचे योगदान दिले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत जिल्ह्यातील १० आदर्श शाळांना प्रत्येकी एक याप्रमाणे लॅपटॉप वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर यांनी कार्य संस्कृती, शालेय गुणवत्ता वाढ याबाबत मार्गदर्शन केले.
या वितरण कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व आदर्श शाळांचे मुख्याध्यापक, स्मार्ट कार्गो कंपनीचे प्रतिनिधी बजरंग शिंदे व महेश घाडगे, डाएटमधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक अनुपमा तावशिकर यांनी केले. स्मार्ट कार्गो कंपनीचे प्रतिनिधी बजरंग शिंदे यांनी लॅपटॉपच्या शैक्षणिकदृष्ट्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्मार्ट कार्गो कंपनी व डाएटचे आभार मानले. सूत्रसंचालन आदर्श शाळा जिल्हा नोडल अधिकारी राजेंद्र लठ्ठे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT