कोकण

चिपळुणात नालेसफाईचे काम वेगाने

CD

३७ (पान ५ साठीमेन)

-rat२p२१.jpg ः
P२४M८१०१७
चिपळूण ः जेसीबीद्वारे नालेसफाई करताना पालिकेचे कर्मचारी.
-------------

चिपळुणात नालेसफाईचे काम गतीने

पालिका सज्ज ; जेसीबीसह सहा सफाई कर्मचारी कार्यरत, नागरिकातून समाधान

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. २ ः दरवर्षीप्रमाणे चिपळूण पालिकेकडून शहर व परिसरात नालेसफाईला सुरवात करण्यात आली आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने हे काम हाती घेतले आहे.
चिपळूण शहरात अस्तित्वात असलेले अनेक नाले सध्या दगडमातीसह कचरा, प्लास्टिक बॉटल्सच्या विळख्यात सापडलेले दिसून येत आहेत. याशिवाय छोटी-मोठी झाडी, गवत वाढलेले आहे. यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. तुंबलेल्या या नाल्यांमुळे दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाणही वाढते. परिणामी, नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात तुंबलेल्या नाल्यांमधील पाणी लोकवस्तीसह रस्त्यांवर येते. यामध्ये नागरिकांचे नुकसान होतेच शिवाय वाहतुकीवरही त्याचा परिणाम जाणवतो. यामुळे पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मार्च ते एप्रिल महिन्यापासून ते अगदी मे अखेरपर्यंत शहरातील सर्व नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते. त्यानुसार यावर्षीही मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात नालेसफाईवर जोर देण्यात आला आहे.
शहरात जवळपास १७ किमीचे नाले आहेत. त्यापैकी ज्या ठिकाणी जेसीबी, पोकलेन जाते तेथे या यंत्रणा वापरून नालेसफाईला सुरवात झाली आहे. सध्या एक जेसीबी, एक पोकलेनद्वारे काम सुरू आहे. ज्या परिसरातील नाल्यांमध्ये मशिनरी वापरणे शक्य नाही तेथे मनुष्यबळ वापरले जात आहे. सध्या सहा सफाई कर्मचारी या कामासाठी कार्यरत आहेत.
---------
मोहीमेचे स्वागत
चिपळूण पालिकेकडून शहरात सुरू असलेल्या नालेसफाईमुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव कमी होणार. त्यामुळे आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न मार्गी लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी पालिकेने घेतलेल्या या मोहीमेचे नागरिकांतून स्वागत केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT