कोकण

उध्दव ठाकरेंच्या आजच्या सभेची जय्यत तयारी

CD

swt235.jpg
81130
कणकवलीः येथे होणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभास्‍थळाची पाहणी शिवसेना जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर, आमदार वैभव नाईक यांनी केली.

उध्दव ठाकरेंच्या आजच्या
सभेची जय्यत तयारी
कणकवलीत आयोजनः राऊत यांचा प्रचार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २ः शहरातील उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या (ता. ३) सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. शिवसैनिकांचा जनसागर या सभेत पहायला मिळेल, असा विश्वास शिवसेना जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज येथे व्यक्त केला. सर्वसामान्य जनतेमध्ये मोदी सरकारच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या लाटेत सर्वसामान्य जनता राणे, मोदींचा पराभव करेल असेही ते म्‍हणाले.
येथील सभास्थळाची पारकर यांच्यासह आमदार वैभव नाईक आदींनी पाहणी केली. यावेळी बोलताना श्री. पारकर म्‍हणाले, ‘‘नुकतीच रत्‍नागिरीत श्री. ठाकरे यांची सभा झाली. त्‍यानंतर उद्या (ता.३) कणकवलीत सभा होत आहे. या सभांमुळे शिवसेना ठाकरे गट कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेमध्ये उत्स्फुर्त वातावरण निर्माण झाले आहे. महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेला उध्दवस्त करणारं मोदी सरकार उलथविण्याची मोठी संधी या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेला मिळालेली आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT