Bopoli Village esakal
कोकण

एखादी हटके सहल करायची असेल, फ्लॉवर व्हॅलीमध्ये रमायचं असेल तर 'या' ठिकाणी जरूर भेट द्या..

एखादी हटके सहल करायची असेल आणि फ्लॉवर व्ह्यॅलीमध्ये रमायचे असेल तर जरूर भेट द्या.

सकाळ डिजिटल टीम

मंदिरात नवसवगैरे फेडणे चालू असते. आपण तेथूनच जरा पुढे गेलो की, बारमाही धबधबा आहे.

-पराग वडके, रत्नागिरी parag.vadake@gmail.com

कोकणच्या उंबरठ्यावर अनेक गावे आहेत जी कोकणात उतरताना जणू स्वागताला उभी असल्यासारखी दिसतात. अशातीलच एक गाव म्हणजे विजापूर-गुहागर मार्गावरचे (Bijapur-Guhagar Road) बोपोली. तुम्ही कोल्हापूर, पुणे, कराडकडून निघालात की, मध्ये पाटण तालुका लागतो. पाटणवरून कोयनानगर आणीचा रस्ता आहे. हा आठ किमीचा रस्ता निसर्गरम्य आहे. चार-पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी असलेले नैसर्गिक ट्री टनेल होते. पूर्ण आठ किमी गोलाकार झाडाचे छप्पर, भरउन्हात थंडावा असे नंतर ‘विकास’ नावाचा प्रकार उगवला आणि साधारण काही हजारात झाडे तोडून हे ट्री टनेल कापून काढले गेले.

पाटण कोयनानगर रस्त्याच्या निसर्गरम्य वातावरणात उजव्या बाजूला एक फाटा फुटतो आणि वर डोंगरात जाऊ लागतो. तिथेच बोपोली गाव आहे. आपल्याला जायचे असते बोपोली गावातून (Bopoli Village) वर शिखराकडे. आंबाखेळती देवीच्या (Aamba Devi) मंदिरात आणि बारमाही धबधब्याकडे. साधारण दोन किमी चढण आहे; पण चढण उभी नसल्याने वृद्धसुद्धा हळूहळू जाऊ शकतात. सर्वात बेस्ट सीझन म्हणजे पाऊस संपता संपता रानफुले उगवतानाचा काळ. तुम्ही मस्त काश्मीर परिसरातील फ्लोवर व्ह्यॅलीमध्ये आहात असे फिल होते.

कारण, पायाखाली मस्त हिरवेगार कोवळे लुसलुशीत गवत आणि हजारो रंगबेरंगी छोटीछोटी रानफुले, त्यात सकाळची कोवळी किरणे पडली असतील तर अजूनच सोनेपे सुहागा. तर अशा वातावरणात आपण मस्त ताजा ताजा ऑक्सिजन घेत ही वळणावळणाची चढण चढत एका पुरातन अंबादेवीच्या मंदिरापाशी येतो. मंदिर पूर्ण काळ्या दगडातून बांधलेले आहे. अर्थात, या मंदिराची कहाणीसुद्धा आहे. फक्त पांडवांनी शेवटचे बांधलेले एका रात्रीतील मंदिर असा शेवट आहे. या मंदिरात एक खिडकी आहे. त्या खिडकीला नक्षीदार दगडी जाळी आहे. आपण एकूण किती छिद्र आहेत हे मोजायला सुरुवात करतो; पण दरवेळी चुकतो. बऱ्याच प्रयत्नांती बरोबर संख्या गाठतो.

मंदिरात नवसवगैरे फेडणे चालू असते. आपण तेथूनच जरा पुढे गेलो की, बारमाही धबधबा आहे. अर्थात, उन्हाळ्यात एकदम बारीक धार असते; पण इथे एक झरा आहे तो अखंड वाहत असतो आणि बोपोली गावाला पाणी पुरवतो. चहुबाजूला उंच उंच शिखरे आहेत. त्या दिवशी आम्हाला दोन तरुण दिसले. हातात सापासारखे काहीतरी होते. पाहतो तो घोरपड. आता का पकडली होती माहीत नाही; पण बरेच प्राणी या पट्ट्यात आहेत. पट्टेरी वाघ, बिबट्या, अस्वले, कोयनेच्या जंगलाशी कनेक्ट असल्याने वावर असतो. त्यातच जिवंत झरा असल्याने येथे पाणी प्यायला जंगली प्राणी येतात. माणसांची रहदारी नसते.

एखादी हटके सहल करायची असेल आणि फ्लॉवर व्ह्यॅलीमध्ये रमायचे असेल तर जरूर भेट द्या. या बोपली गावाच्याविरुद्ध बाजूला एक दत्तस्थान आहे. तेथील स्वामींची मूर्ती पाहण्यारखी आहे. तुम्हाला भानामतीसारखे त्या मूर्तीच्या डोळ्यात अडकायला होते. अर्थात, वेळेचे बंधन आहे त्यामुळे वेळ पाहूनच जावे लागते; पण अंगावर सर्व झाडांचे वेल अंगावर घेत पायऱ्या चढत चढत या दत्तस्थानात जायला मजा येते. मस्त गारवा असतो आणि मुख्य म्हणजे ही दोनही स्थाने विजापूर-गुहागर रोडला लागूनच आहेत. त्यामुळे वेळ असेल तर सहज गाडी पार्क करून दोन-तीन तासांत पाहून होतात.

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT