कोकण

जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांत ५जी पॉस मशिन

CD

१० ( पान ३ साठी, अॅंकर )

सर्व रेशन दुकानांत ५जी पॉस मशिन

जिल्ह्यासाठी ९४७ उपलब्ध ; हातांचा ठसा, डोळ्याचे बुब्बुळ होणार स्कॅन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये अद्ययावत पॉस मशिन वाटप झाल्या आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये पुरवठा विभागाकडून मागणी करण्यात आलेल्या ९४७ पॉस मशिन जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
राज्य शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात ९४७ नवीन ५ जी पॉस मशिन मिळाल्या आहेत. यामुळे आता ५ जी पॉस मशिन मिळाल्यामुळे रेशनधान्य दुकानदार आणि ग्राहकांकडून व्यक्त केली जाणारी नाराजी दूर होणार आहे. २०१७ मध्ये या सर्व रेशन दुकानांना पॉस मशिन उपलब्ध करून देण्यात आली होती. या मशिनच्या देखरेख दुरुस्तीचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले होते. पाच वर्ष पूर्ण होऊनही सर्व रेशन दुकानदार शासनाकडून मिळालेल्या याच मशिनचा वापर करत आहेत. शिधा वाटप करताना या जुन्या मशिनमुळे खूप अडचणी येत होत्या.
जिल्हा पुरवठा विभागाकडून आता जिल्ह्यातील ९४३ रेशन दुकानांसाठी तब्बल ९४७ पॉस मशिन प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला आनंद शिधा वितरण करतानाही या मशिनमुळे खूप अडचणी येत होत्या. बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने येणारी ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने नवीन पॉस मशिनसाठी राज्य अन्न आणि पुरवठा विभागाकडे मागणी केली गेली आहे. या मागणीमध्ये अद्ययावत ४जी आणि ५जी पॉस मशिन मिळाव्यात, असा उल्लेख करण्यात आला होता. आता शासनाने या मागणीनुसार जिल्ह्यात नवीन ५ जी पॉस मशिन प्राप्त झाल्या आहेत.
-------
चौकट
मशिनची वैशिष्ट्य...

या नवीन मशिनवर हातांचे ठसे जर जुळले नाहीत तरी संबंधित व्यक्तीच्या डोळ्याचे बुब्बुळ स्कॅन करून आधारकार्ड पडताळणी केली जाऊ शकते. या आधी कित्येक ज्येष्ठ नागरिकांच्या हाताचे ठसे न जुळल्यामुळे त्यांना रेशन दुकांनावर धान्य मिळण्यास अडचण निर्माण होत असे. इंटरनेट नेटवर्क मिळण्याबाबतही समस्या निर्माण होत असत; मात्र, आता नवीन मशिनमध्ये ५जी तंत्रज्ञान असल्याने नेटवर्क समस्या, हातांचे ठसे स्कॅन करण्याची समस्या दूर झाल्या आहेत.
----------
चौकट-
तालुकानिहाय मशिनची संख्या
चिपळूण - १४६
मंडणगड - ४७
दापोली - १२
खेड - २६
रत्नागिरी - ३३
संगमेश्वर - १३१
राजापूर - ९७
लांजा - ६९
गुहागर - ७१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT