कोकण

शहरातील साठहून अधिक बॅनर जप्त

CD

६ (टूडे १ साठी)
-----------

rat१०p१०.jpg -
P२४M८२७२७
चिपळूण पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केलेले बॅनर व फलक.

चिपळूण शहरातील साठ फलक जप्त
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : मुदत संपलेले आणि अनधिकृतरित्या झळकणारे साठहून अधिक बॅनर व फलक शहरातून जप्त करण्यात आले आहेत. चिपळूण पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई सुरू केली. विशेष म्हणजे मतदान जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले फलक देखील प्रशासनाने हटविले आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. आचारसंहिता लागू झाल्याच्या दिवशी त्यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्वच भागातील लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी यांच्यासह सर्वच प्रकारचे बॅनर व फलक जप्त करण्यात आले होते. त्यानंतर काहींनी पालिका प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन बॅनर उभारले तर अनेकांनी अनधिकृतरित्या बॅनरबाजी केली होती. दरम्यान, ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे; मात्र आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शहरातील अनधिकृत तसेच मुदत संपलेले बॅनर जप्त करण्याची कार्यवाही हाती घेतली. त्यानुसार शहरातून साठहून अधिक बॅनर व फलक जप्त करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT