कोकण

‘त्या’ वाहन चालकांसाठी मतदानाची व्यवस्था करा

CD

82774
कणकवली : येथील प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना कणकवली भाजपच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर आदी उपस्थित होते.


‘त्या’ वाहन चालकांसाठी
मतदानाची व्यवस्था करा

कणकवलीत भाजपतर्फे मागणी

कणकवली, ता. १० : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रे पोचविणे तसेच अन्य सोई सुविधांसाठी भाडे तत्‍वावर वाहने घेण्यात आली. या वाहनांवरील वाहन चालक मतदानापासून वंचित राहिले. त्‍यांना मतदान करण्यासाठी यंत्रणा राबवावी, अशी मागणी कणकवली भाजपच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना देण्यात आले.
भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे जिल्‍हाध्यक्ष संदीप मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर आदींनी आज प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेऊन त्‍यांना निवेदन दिले. निवेदनात म्‍हटले आहे की, ‘‘लोकसभा निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी अनेक वाहने भाड्याने घेण्यात आली. या वाहनांवरील वाहन चालक मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या आदल्‍या दिवसापासून मतदान यंत्रे मुख्यालयात पोच होईपर्यंत कार्यरत होते. त्‍यामुळे या वाहन चालकांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता आले नाही. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी मतदान झाले असले तरी मतमोजणी प्रक्रिया ४ जून रोजी सुरू होणार आहे. त्‍यापूर्वी या वाहन चालकांना मतदान करता यावे यासाठी प्रक्रिया राबविण्यात यावी.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT