कोकण

टाटा तनिष्कच्या ऑफरला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

टाटा तनिष्कच्या ऑफरला
ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर टाटा तनिष्कने सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. कुडाळ येथील ‘तनिष्क’ या भव्य दालनात रविवारपर्यंत (ता. १२) चालणाऱ्या या ऑफरला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी अक्षय्य तृतीया हा एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. या दिवशी ग्राहक मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने खरेदी करत असतात. याच दिवसाचे औचित्य साधून टाटा तनिष्कने सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना सोन्याच्या आणि हिरेजडीत दागिन्यांवर मोठी सूट मिळेल, असे टाटा तनिष्क कुडाळचे संचालक जयंत भाटिया यांनी सांगितले. या ऑफरमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १० ते २० टक्क्यांपर्यंत तर हिरेजडीत दागिन्यांवर खरेदीच्या रकमेवर ५ ते २० टक्केपर्यंत सूट देण्यात येत आहे. टाटा तनिष्कच्या प्रत्येक दागिन्यासोबत ग्राहकांना शुद्धतेचे प्रमाणपत्र दिले जाते. टाटा तनिष्कमध्ये १०० हून अधिक मंगळसूत्रांचे प्रकार, ५०० हून अधिक बॅंगल्सचे प्रकार, तोडे, हार आणि इतर अनेक दागिने उपलब्ध आहेत. तसेच २४ कॅरेट सोन्यातील पाटली, बिल्वर आणि पोहेहारही उपलब्ध आहेत. लक्ष्मीहार, पुतळीहार, अंगठ्या, कर्णफुले, नेकलेस आणि नेकनेल सेटसारख्या विविध दागिन्यांचे नमूनेही टाटा तनिष्कमध्ये उपलब्ध आहेत. सुलभ खरेदीसाठी टाटा तनिष्क भिशीमध्येही गुंतवणूक करता येते. टाटा तनिष्कची अक्षय तृतीया ऑफर ही सोन्याचे आणि हिरेजडीत दागिने खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी टाटा तनिष्कच्या जवळच्या स्टोअरला भेट द्यावी, असे आवाहन संचालक श्री. भाटिया यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT