कोकण

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ

CD

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास
१५ जूनपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नवीन अर्ज नोंदणी व जुन्या अर्जांच्या नूतनीकरणासाठी १५ जून अखेर मुदतवाढ दिल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली.
२०२२-२३ करिता पुन्हा शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी शासनाने ३० एप्रिल अखेर आदेशित केले होते; मात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज कमी प्रमाणात प्राप्त होत असल्याने अनुसूचित, जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गासाठी २०२३-२४ करिता महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी तसेच २०२२-२३ करिता पुन्हा शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी शासनाने १५ जून अखेर मुदतवाढ दिली आहे. ही प्रक्रिया आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरू आहे. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील, असे पत्रकात नमूद आहे. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीसाठी या कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत प्राचार्यांनी कार्यवाही करावी. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

एकोंडीत शेतकऱ्यांनी अडविला मुश्रीफांच्या गाड्यांचा ताफा; पालकमंत्री म्हणाले, '..तर मी राजीनामा देईन'

Diwali 2024: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी अन् भगवान गणेशाला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या? वाचा सविस्तर

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

SCROLL FOR NEXT