कोकण

क्राईम

CD

बालिकेच्या मृत्यूप्रकरणी
ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा
दाभोळ : बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रेवली येथील चिराखाणीवर २६ एप्रिलला दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रकाश राठोड व त्यांची पत्नी काम करत होते. त्यांनी त्यांच्या ११ महिन्यांची मुलगी नेहाला बाजूला ठेवले होते. तेवढ्यात खाणीवर चिरा वाहतूक करण्यासाठी असलेला ट्रकचा (एमएच १२, एएल ९३२) चालक रमेश किसन चव्हाण याने मागे-पुढे न पाहता ट्रक सुरू केला. यावेळी ट्रक चालकाच्या बाजूला असलेल्या पुढील चाकाचा टायर जवळच असलेल्या नेहाच्या उजव्या पायाच्या मांडीवरून गेला व ती टायरखाली अडकली व गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी नवी मुंबई येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा २९ एप्रिलला मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालक रमेश चव्हाण याच्याविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलिस अंमलदार करत आहेत.
---------------
मोटार- रिक्षा धडकेत
तीन प्रवासी जखमी
दाभोळ : दापोली तालुक्यातील वाकवली येथे रिक्षा व मोटारीमध्ये झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह दोघेजण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ६) संतोष सखाराम शिगवण (४१, कुंभवे शिगवणवाडी) हे रिक्षा (एमएच ०८, एक्यू ३९७८) घेऊन सुकदर ते वाकवली असे प्रवासी घेऊन जात होते. ते वाकवली शाळेजवळ आल्यानंतर दापोलीकडून खेडकडे मोटार (एमच ०४, सीडीसी ४५०२) घेऊन जाणारे सुभाष सीताराम राठोड (३२, रा. जालगाव) यांना गाडीचा वेग आवरता न आल्याने त्यांनी रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक संतोष शिगवण यांच्यासह प्रवासी संजय तुकाराम नवलू (४४, रा. कुंभवे), सुमित्रा रामजी कोळंबे (७२, रा. सुखदर) हे तिघेजण जखमी झाले. या प्रकरणी संतोष शिगवण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित सुभाष राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT