कोकण

दाभोळ ः मतपेट्या अलिबाग जिल्हा क्रीडा संकुलात

CD

मतपेट्या अलिबाग क्रीडा संकुलातील स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित

रायगड मतदारसंघ; आयोगाच्या मानकांचे पालन

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १० : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, गुहागर व दापोली या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, अलिबाग या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत.
स्ट्राँगरूमच्या सुरक्षेकरिता निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे सुरक्षा बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण बंदोबस्त व्यवस्थेचे प्रभारी अधिकारी म्हणून विनीत चौधरी, उपविभागीय पोलिस अधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
पहिल्या स्तरामध्ये केंद्रीय सशस्त्र दल सीआरपीफ ११३ बटालियन जी कंपनीचे एक प्लाटून नेमण्यात आले आहे. या प्लाटूनमधील सशस्त्र जवान हे स्ट्राँगरूमच्या जवळच्या सर्वात आतील कॉर्डन १ मध्ये असतील व त्यांची स्ट्राँगरूमवर २४ तास नजर असेल. तसेच स्ट्राँगरूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे कंट्रोलरूम त्यांच्या ताब्यात असेल. दुसऱ्या स्तरामध्ये राज्य सशस्त्र दल एसआरपीएफ ग्रुप ८, मुंबई येथील एक प्लाटून नेमण्यात आले आहे. या प्लाटूनमधील सशस्त्र जवान हे स्ट्राँगरूमच्या जवळच्या कॉर्डन २ मध्ये असतील व त्यांची कॉर्डन १ च्या बाहेरील परिसरामध्ये २४ तास पेट्रोलिंग असेल, तसेच यातील वॉचटॉवरवर तैनात जवान आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवून असतील. तिसऱ्या स्तरामध्ये रायगड पोलिसदलातील ६ अधिकारी व ४० पोलिस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये सशस्त्र अंमलदारांचाही समावेश असेल. हे अंमलदार स्ट्राँगरूमच्या जवळच्या कॉर्डन ३ मध्ये असतील व त्यांची कॉर्डन २ च्या बाहेरील परिसरात तसेच जिल्हा क्रीडा संकुलाच्या आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये २४ तास गस्त असेल. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तसेच प्रत्येक व्यक्तीची मुख्य प्रवेशद्वाराजवळ तपासणी केली जाईल व केवळ अधिकृत व्यक्ती व वाहनांनाच प्रवेश दिला जाईल.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून त्याद्वारेही परिसरात नजर ठेवली जाणार आहे. संपूर्ण बंदोबस्तामधील जवानांमध्ये आपापसात समन्वय ठेवण्यासाठी बिनतारी संदेशवहन/दळणवळणाची सुविधा असून रायगड पोलिसदलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाचे अधिकारी संपूर्ण बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT