कोकण

अपघातात तिघे जखमी

CD

२२ (पान ५ साठी)

पोलादपूरजवळील अपघातात दोन ठार

लांज्यातील तिघे जखमी ; चारचाकी-कंटेनरची धडक

सकाळ वृत्तसेवा
लांजा ता. ११ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे चारचाकी आणि कंटेनरच्या अपघातात दोघे जण ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये जखमी लांजा तालुक्यातील खानवली येथील आहेत. हा अपघात शुक्रवारी (ता. १०) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून मोटार रत्नागिरी जिल्ह्यातील खानवली बनेकडे जात होती. या मार्गावर त्या वेळी मोटार भरधाव वेगात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मोटारीने कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, मोटार अर्ध्यापर्यंत कंटेनरच्या खाली घुसली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिल भीमा शिंदे (वय ४०, रा. पुणे) या चालकांचा मृत्यू झाला तर सुमती यशवंत शिंदे (वय ७५) यांचाही अपघातात मृत्यू झाला. अपघातात नीलेश अनंत दळवी (रा. खानवली, लांजा), जानवी नीलेश दळवी (वय ४५), यश नीलेश दळवी (वय १८, सर्व रा. खानवली, ता. लांजा) असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या मोटारीत पाच प्रवासी प्रवास करत होते. अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास ४५ मिनिटांचा कालावधी लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक अनिल जाधव, पीएसआय मांदळे, सर्व पोलिस कर्मचारी, कशेडी महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण धडे, पोलिस कर्मचारी यांच्यासह पोलादपूर ग्रामस्थ, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. नरवीर रेस्क्यू टीम, श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेची माहिती समजतात महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT