कोकण

खेड-कोकण रेल्वे हाऊसफुल्ल

CD

rat12p13.jpg
83107
खेडः कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी.
rat12p14.jpg
83108
एस.टी. बसेसना पर्यटक आणि चाकरमान्यांची पसंती.
------------

कोकण रेल्वे हाऊसफुल्ल
चाकरमान्यांची पहिली पसंती; तिकीटासाठी रांगा
खेड, ता.१२ : सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात आपल्या मूळगावी दाखल होत आहेत. काही चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासाची वाट धरली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. महिनाभर बहुतांशी रेल्वे गाड्यांचे तिकीट बुकींग फूल्ल झाले असुन, बहुतांशी गाड्यांची तिकीटे सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या आसपास प्रतिक्षेत आहेत. तर काही गाड्यांची वेटींग लिस्टही फुल्ल झाल्याने बुकींग बंद केले आहे. रेल्वे स्थानकावरील तिकीट केंद्रावर प्रवाशांची तिकीटांसाठी मोठी गर्दी आहे.
खासगी आराम बस, अन्य खासगी वाहनांनी गावी येणाऱ्यापेक्षा कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे गाड्या सध्या हाऊसफुल्ल आहेत. बहुतांशी रेल्वे गाड्यांचे तिकीट एक-दोन महिने आधीच बुकींग केली आहेत. बरेचजण एक दिवस आधी तत्काळ तिकीटे काढून गावी दाखल होत आहेत. मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या बहुतांशी रेल्वे गाड्यांच्या तिकीटांची प्रतीक्षा यादी सरासरी साडेतीनशे ते चारशेच्या जवळपास आहे. एप्रिलच्या गावी आलेले चाकरमानी मुंबईला परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे त्यांचीही तिकीटांसाठी गर्दी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT