कोकण

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त दापोलीत सायकल फेरी

CD

rat12p28.jpg
83193
वळणे : सायकलस्वारांना काथ्या उद्योगाची माहिती देताना उद्योजक श्रवण दांडेकर.
------
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त
दापोलीत सायकल फेरी
औद्योगिक कंपन्यांना भेट; तंत्रज्ञानाची घेतली माहिती
दाभोळ, ता. १२ : देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे रोजी साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस आहे. या निमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी (ता. १२) सायकल फेरी काढण्यात आली. या सायकल फेरी दरम्यान वळणे एमआयडीसी येथील काही औद्योगिक कंपन्यांना भेट देऊन तिथे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती करुन घेण्यात आली.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, उदयनगर, वडाचा कोंड, जालगाव बाजारपेठ, वळणे एमआयडीसी, आझाद मैदान असा १२ किमीचा होता. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. वळणे एमआयडीसी येथील त्रिमूर्ती प्लास्टिकचे अरुण नरवणकर यांनी प्लास्टिक वस्तू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची, उपकरणांची माहिती दिली. अजरालय ऍग्रो इंडस्ट्रीजचे श्रवण दांडेकर यांनी कोकोपीट, काथ्या, सुंभ, कोकेडामा आदी कृषी उत्पादने, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान याबद्दल माहिती दिली.
ओरा ग्लास फायबरचे अंकित वारणकर यांनी ग्लास फायबर, मोल्डिंग वस्तू इत्यादींचे आणि बालाजी पावडर कोटिंगचे जांगीड यांनी पावडर कोटिंग तंत्रज्ञान बद्दल सांगितले, मशिन्स दाखवल्या. ग्रोवर्स गेट नर्सरीचे हृषीकेश मयेकर यांनी विविध शोभेच्या रोपांबद्दल माहिती दिली. अरुणश्री फार्म फुडचे राजन साखळकर, कोकण फळप्रक्रिया काजू फॅक्टरीचे धनंजय यादव, सिटी कुल आइस्क्रिम व सुरुची फूड्सचे प्रवीण कलाल यांनी वेगवेगळ्या फळांवर प्रकिया करुन बनवले जाणारे पदार्थ, त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान याबद्दल मार्गदर्शन केले. आइस्क्रिम कसे बनवले जाते ते दाखवले. सर्वांनी येथे बनलेल्या काजू पदार्थ, कैरी पन्हे, कोकम सरबत, आइस्क्रिम आदीचा आस्वाद घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT