कोकण

वेंगुर्लेत निनादले शास्त्रीय संगीताचे सूर

CD

83340
वेंगुर्ले ः अंधत्वावर मात करीत जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तबला, हार्मोनियम व गायन या तिन्ही क्षेत्रात ‘विशारद’ पदवी मिळविणाऱ्या सचिन पालव याने गायन सादर केले.


वेंगुर्लेत निनादले शास्त्रीय संगीताचे सूर

‘स्वरसंध्या’ मैफलीस प्रतिसाद ः भक्तिगीत, भावगीतांनीही रंगत

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १३ ः येथील तबलापटू (कै.) रमेश मेस्त्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या ''स्वरसंध्या'' या संगीत मैफिलीतील शास्त्रीय संगीताच्या सुरांनी वेंगुर्लेवासीय मंत्रमुग्ध झाले. या मैफिलीत गायकांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यगीत व अभंग सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली.
महादेव मेस्त्री हे गेली दोन वर्षे आपल्या बंधूच्या स्मृतीप्रित्यर्थ माणिक चौक येथील विठ्ठल मंदिरात संगीत मैफिलीचे आयोजन करीत आहेत. यंदाचे हे तिसरे वर्ष होते. कार्यक्रमाचे उद्‍घाटन सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी वेंगुर्ले शाखेचे व्यवस्थापक पुरुषोत्तम राऊळ, संगीतप्रेमी नित्यानंद आठलेकर, विजय मेस्त्री व आयोजक महादेव मेस्त्री यांच्या हस्ते झाले. या संगीत मैफिलीत माणगाव येथील योगेश बोरचाटे, विजय मेस्त्री, पल्लवी पिळणकर, ओजस्वी पिळणकर, ऋचा पिळणकर, उभादांडा येथील अमृता पेडणेकर यांनी विविध गाणी सादर केली. त्यांना तबल्यासाठी जस्मित पिळणकर, हार्मोनियमसाठी पल्लवी पिळणकर यांनी साथ केली. सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे यांनीही गीत सादर केले.
त्यानंतर अंधत्वावर मात करीत जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तबला, हार्मोनियम व गायन या तिन्ही क्षेत्रात ''विशारद'' पदवी मिळविलेले वडखोल येथील सचिन पालव याचेही गायन झाले. त्याच्यासोबत त्याची विद्यार्थिनी पूर्वा जोशी (मठ) हिनेही गाणी सादर केली. यांना वेदांत बोवलेकर व (तबला), प्रसन्ना गावडे (पखवाज), सचिन पालव (हार्मोनियम), सुयोग जोशी (टाळ) यांनी साथ दिली. सचिन पालव याच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल अनघा गोगटे व पुरुषोत्तम राऊळ यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी वेंगुर्ले शाखेचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT