कोकण

शहरातील सर्व्हिस रोड मजबूत करा

CD

२३ (टूडे २ साठी)

- rat१३p१४.jpg-
P२४M८३३२१
लांजा ः शहरातील सर्व्हिस रोड.

शहरातील सर्व्हिस रोड मजबूत करा

लांजा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १३ : लांजा शहरात सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी सर्व्हिस रोडचा वापर केला जातो; मात्र ते रस्ते मजबूत स्थितीत तयार करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडे करण्यात आली.
लांजा शहरामध्ये मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. सध्या लांजा शहरात पुलाचे काम चालू असून त्यासाठी रस्त्यावर खड्डे पाडण्यात येत आहेत; पण जो पर्यायी मार्ग आहे त्यामुळे शहरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. शहरातील व्यापाऱ्‍यांच्या मालाचे नुकसान होत आहे. धुळीमुळे श्वसनाचा त्रासही लोकांना होत आहे. तरी महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना सूचना देऊन पर्यायी मार्ग हा मजबुतीकरण व डांबरीकरण करूनच काम करण्याच्या सूचना देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील या निवेदनात देण्यात आला आहे. हे निवेदन सादर करताना सोशल मीडिया फ्रंटचे जिल्हाध्यक्ष दाजी गडहिरे व युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT