कोकण

खेडसह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

CD

८३३९७
८३३९८
२४M८३४३४
चिपळूण ः पोफळी येथील महानिर्मितीच्या वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडाचे झाड कोसळले.

पाच तालुक्यात पावसाचा शिडकाव

रत्नागिरी, खेड, दापोली, राजापूर, चिपळूणचा समावेश; जनजीवन विस्कळित, वीजपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ : दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या वादळी पावसानंतर सोमवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात जोरदार वादळी वारे व विजेच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. दोन तास कोसळलेल्या पावसाने कहर केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जनजीवन अंशतः विस्कळीत झाले. हीच परिस्थिती रत्नागिरी ग्रामीण भागात, संगमेश्वर. चिपळूणसह राजापूरमध्येही पहावयास मिळाली.

पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काळोख दाटून येत काही क्षणात वादळी वारे व विजेच्या कडकडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने वातावरणामध्ये गारवा आला. उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला. त्याचबरोबर अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. ग्रामीण भागालादेखील मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दरम्यान, वादळी वाऱ्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर मात्र कायम राहिला होता.

संगमेश्वरमध्येही हजेरी
दापोली तालुक्यातही सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्याच्या ग्रामीण भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली; परंतु असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासाही मिळाला. संगमेश्वर तालुक्यात रविवारी रात्री पावसाचा शिडकावा झाला. सोमवारी दुपारपासून पावसाळी वातावरण तयार झाले होते. काही भागात वादळी वारे झाले. देवरूखला पावसाचा शिडकावा झाला. काही भागात थोडासा पाऊस झाला. अवकाळी पावसाने आंबा बागायतदार व आंबा विक्रेते यांचे नुकसान झाले आहे.

चिपळुणातील भागात वादळी

चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अवकाळी पाऊस पडल्याने चिपळूण बाजारपेठेतील मोकळ्या जागेत व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. चिपळूणमध्ये सोमवारी दुपारपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी वादळी वारा सुटले. यामुळे पावसामुळे महावितरणकडून शहरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला. सायंकाळी चार वाजता पोफळी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाला तो सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. ग्रामीण भागाला पावसाचा मोठा तडाखा बसला. पोफळीतील मानकरवाडी पंडववाडीत परिसरात झाडे कोसळली. न्यू इंग्लिश इंग्लिश स्कूलच्या समोरील वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. पोलिस ठाण्यामार्गे कॉलनीकडे जाणारा रस्ता या अपघातानंतर बंद झाला आहे. चिपळूण गुहागर मार्गावर पिंपळी शिरगाव अलोरे परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे.

राजापुरात जोरदार
राजापूर तालुक्यात सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याचा आंबा आणि काजू पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊन नुकसान होण्याची भीती बागायतदारांकडून वर्तवविण्यात येत आहे. गेल्या काही दिवस तालुक्यामध्ये कमालीचे तापमान राहीले आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन अन् जोडीला उकाडा होता. गेले दोनदिवस ढगाळ वातावरण राहीले आहे. अशा परिस्थितीमध्ये हवामान खात्याकडून काही भागामध्ये तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आज तालुक्यातील पाचल, परिसर व अन्य भागामध्ये जोरदार पाऊस पडला. अर्धातासाहून अधिक काळ सरी कोसळत होत्या.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT