कोकण

उड्डानपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी

CD

हा फोटो मोठा वापरा
83439
बांदा ः येथे उड्डानपुलाचे सुरू असलेले काम.

83440
बांदा ः येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ. (छायाचित्रे ः नीलेश मोरजकर)


उड्डानपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी

बांदावासीयांसह चालक त्रस्त ः उपाययोजना राबविण्याची पोलिसांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः येथे महामार्गावर उड्डाणपुलाच्या परिसरात सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक खोंळबण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे वाहन चालकांसह ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे योग्य ती उपाययोजना राबवा, अशी मागणी बांदा ग्रामस्थांच्या माध्यमातून सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत ग्रामस्थांच्या माध्यमातून श्री. बडवे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की बांदा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने एकदिशा वाहतूक सुरू आहे. मागील आठवडाभर येथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहन चालकांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्तापला सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी अपघाताच्या घटना घडत असून रुग्णवाहिकेची अत्यावश्यक सेवा देखील प्रभावित होत आहे. बांदा ग्रामस्थांनी याबाबत महामार्ग वाहतूक नियंत्रण कक्ष मुंबई व महामार्ग वाहतूक निरीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत संबंधित विभागाकडून दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या वाहतूक नियंत्रकांची कामकाजची वेळ संपल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली. गोव्यात वैद्यकीय सेवेसाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकेंची संख्या ही अधिक असून याठिकाणी दोडामार्ग, कोल्हापूर, बांदा शहर, गोवा, मुंबई असे सर्व रस्ते एकत्र येत असल्याने प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. यासाठी बांदा पोलीस निरीक्षक श्री. बडवे यांची भेट घेऊन याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. वाहतुकीचे नियोजन करण्याचे आश्वासन निरीक्षक श्री बडवे यांनी यावेळी दिले. यावेळी गुरु कल्याणकर, हेमंत दाभोलकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, आबा धारगळकर, सौ. रुपाली शिरसाट, सिद्धेश महाजन, मनोज कल्याणकर, शैलेश केसरकर, उदय येडवे, स्मिता पेडणेकर, साई सावंत, आशिष कल्याणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------
चौकट
मनमानी कारभाराचा आरोप
काम करत असलेला ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. मनमानी करून एकमार्गी वाहतूक वळवत आहेत. परिणामी अपघात होत आहेत, असा आरोप यावेळी उपस्थितांनी केला आहे.
---------
चौकट
पर्यटकांची वर्दळ
सध्या उन्हाळी सुट्या सुरू झाल्याने गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांचा संख्या वाढली आहे. मुंबई, गोवा तसेच इतर राज्यातील पर्यटक याच मुख्य मार्गाने गोव्याला जात आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची वर्दळ वाढली असून वाहतूक कोंडी होत आहे.
------------
कोट
बांदा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने तसेच वाहतुकीचे नियोजन नसल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. पावसाळा तोंडावर असून याबाबत योग्य नियोजन न झाल्यास पावसाळ्यात शहरवासीयांना तसेच वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पोलीस प्रशासनाने ठेकेदार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन तसेच स्थानिक ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.
- गुरु कल्याणकर, ग्रामस्थ, बांदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT