कोकण

रत्नागिरी-७७ मत्स्य प्रकल्प करणार कांदळवनाचे संरक्षण

CD

rat१४p२६.jpg-
८३६४५
कांदळवन
-----------
कांदळवनाचे ७७ मत्स्य प्रकल्पातून संवर्धन
बचतगटांच्या माध्यमातून उपक्रम; जिताडा, शिंदाणे, कालवे, खेकड्याचे पालन
रत्नागिरी, ता. १४ : जिल्ह्यात सुरू असलेले मत्स्यपालन, जिताडा, शिंदाणे, कालवे, खेकडा आणि शोभिवंत मत्स्य पालनाचे ७७ प्रकल्प कांदळवन वाढीला व संवर्धनाला मोठा हात देत आहेत. वन विभाग कांदळवन कक्षाच्यावतीने हे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. बचतगटांच्या माध्यमातून हे प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे बचत गटांना उत्पन्नाचा मार्ग मिळविला असून तो यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या खाड्यांचा भाग आहे. या भागात कांदळवनाचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा या कांदळवनाची तोड करुन विविध प्रकल्पही सुरु केले आहेत. विशेषत: कोळंबी प्रकल्पासाठी कांदळवनाची काही भागात तोड झाली आहे. कांदळवनात अनेक जलजीवांचा वावर होतो. पक्षीही मोठ्या प्रमाणात या झाडांच्या आश्रयाला असतात. कांदळवनामुळे जलजीवन फुलण्यास मदत होते. त्यामुळे कांदळवनाचे संरक्षण होण्यासाठी विविध उपक्रम वन विभागाच्या कांदळवन कक्षातर्फे राबवण्यात येत आहेत.
कांदळवन लागवडीकडेही लक्ष देण्यात आले आहे. कांदळवनाच्या संरक्षणाची जबाबदारी बचत गटांवर सोपवण्यात आली आहे. या बचत गटांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी कांदळवन कक्षातर्फे खाडीमध्ये मत्स्यपालन, शिंदाणे-काकई, कालवे, बॉक्स पद्धतीने खेकडे पालन, शोभिवंत मत्स्य पालन उपक्रम राबवले जात आहेत.
वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठान मुंबईमार्फत हे प्रकल्प सुरू असून रत्नागिरीत कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिवीका तज्ज्ञ वैभव बोमले व त्यांचे सहकारी हे प्रकल्प यशस्वी करण्यासाठी बचत गटांना मार्गदर्शन करीत आहेत.
------------
चौकट
...असे सुरू आहेत प्रकल्प
खाड्यांमध्ये मत्स्य पालनाचे सुरू असलेले प्रकल्प रत्नागिरी तालुक्यात ३, गुहागर १ तर राजापूर ४ असे आठ प्रकल्प आहेत. यामध्ये जिताड्या प्रकल्पाचाही प्रामुख्याने समावेश आहे. शिंदाणे, काकई प्रकल्प जिल्ह्यात ५० ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत. त्यात रत्नागिरी ३१, गुहागर ५, राजापूर १४ प्रकल्प आहेत. कालवे पालनाचे १३ प्रकल्प राजापूरमध्ये सुरू आहेत, तर बॉक्स पद्धतीने खेकडा पालनाचे २ प्रकल्प गुहागरमध्ये सुरू आहेत. शोभिवंत माशांचे प्रकल्प राजापूरमध्ये ३ तर रत्नागिरीत १ ठिकाणी सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT