कोकण

पडवे-माजगावमध्ये अनधिकृत उत्खनन

CD

83696
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर. शेजारी आशिष सुभेदार.


पडवे-माजगावमध्ये अनधिकृत उत्खनन

परशुराम उपरकर ः महसूलला दिलेले पुरावे मायनिंगवाल्यांकडे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः उच्च न्यायालयाचा अवमान करून अनधिकृतरीत्या काढलेल्या पडवे-माजगाव येथील मायनिंग उत्खननामागे महसूल विभागाचाच हात आहे, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. आम्ही महसूल अधिकाऱ्यांना पाठविलेले पुरावे संबंधित मायनिंगवाल्यांकडे कसे काय पोहोचतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संबंधित मायनिंग यंत्रणेकडून आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना दम दिला जात आहे; परंतु अशा प्रकारचा दम दिल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही उपरकर यांनी दिला.
उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आशिष सुभेदार, शुभम सावंत, संतोष सावंत आदी उपस्थित होते. उपरकर म्हणाले, ‘‘पडवे-माजगाव येथे अनधिकृत मायनिंग उत्खनन झाले आहे. तब्बल १००० डंपर मायनिंगयुक्त माती उत्खनन करून त्याचे मोर्ले परिसरात डंपिंग करण्यात आले होते. ज्या ठिकाणी मायनिंग उत्खनन झाले आहे, तो भाग इको-सिन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने संबंधित यंत्रणेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. यात महसूल विभागाचा हात असल्याचा संशय आहे. यासंदर्भात आम्ही महसूल अधिकाऱ्यांकडे पुरावे पाठविले असताना हे पुरावे संबंधित मायनिंग उत्खनन करणाऱ्या यंत्रणेकडे लगेच पोहोचले, यावरून संशय बळावला आहे. दुसरीकडे मोर्ले परिसरात डंपिंग केलेले मायनिंगसुद्धा उचलण्यात आले आहे. सद्यस्थितीत हे उत्खनन बंद आहे; मात्र संबंधित यंत्रणेकडून आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना दम देण्याचा प्रकार होत आहे. अशाप्रकारचा दम दिल्यास त्यांची गाठ आमच्याशी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. या संदर्भात ‘वनशक्ती’चे स्टॅलिन दयानंद यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येणार आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT