कोकण

शुभेच्छा फलकांमुळे ‘दिशादर्शक’ गायब

CD

83695
मालवण ः भरड नाक्यावर अशाप्रकारे लावण्यात येणाऱ्या बॅनर्समुळे दिशादर्शक फलक गायब झाला आहे.

शुभेच्छा फलकांमुळे ‘दिशादर्शक’ गायब

बाळू अंधारी ः मालवणात पर्यटक, चालकांची होतेय गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : पर्यटननगरी असलेल्या शहरातील महत्त्वाच्या अशा भरड नाक्यावर लावलेला दिशादर्शक फलक विविध कार्यक्रम आणि वाढदिवस शुभेच्छांच्या बॅनरबाजीमुळे दिसेनासा झाला आहे. यामुळे मालवणात येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. पर्यटकांना एक दिशा मार्ग कळण्यात अडचणी येत असून, चुकीच्या मार्गावर वाहन नेल्यास स्थानिकांचा ओरडा तसेच प्रसंगी वाहतूक पोलिसांच्या कारवाईला नाहक सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासनाने बॅनर हटवून दिशादर्शक फलक ठळकपणे दिसेल, यासाठी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व लायन्स क्लबचे संचालक बाळू अंधारी यांनी केली आहे.
मालवणात पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशी, विदेशी पर्यटक येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात; मात्र मालवणमधील पर्यटनस्थळे व त्यांच्याकडे जाणारे मार्ग शोधताना अरुंद रस्ते व दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे पर्यटकांची मोठी दमछाक होते. मालवण-भरड नाक्यावरून बाजारपेठ व बंदर जेटीकडे जाणारा मुख्य असा एक दिशा मार्ग आहे तर दुसऱ्या बाजूने फोवकांडा-पिंपळ येथून भरड नाक्याकडे येणारा मार्ग आहे. या नाक्यावर पाच रस्ते येऊन मिळतात; मात्र या नाक्यावर पालिकेतर्फे बसविलेला दिशादर्शक फलक सध्या गायब झाल्याचे चित्र आहे. या फलकाच्या समोरच शहरातील विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तर काहीवेळा राजकीय कार्यक्रमांचे फलक, स्वागत व वाढदिवस शुभेच्छांचे बॅनर लावण्यात येतात. सध्या अशा प्रकारचे विविध बॅनर या दिशादर्शक फलकासमोर लागले असल्याने फलक दिसेनासा झाला आहे. त्यामुळे या नाक्यावर आल्यावर कुठे कोणत्या मार्गाने जायचे, याबाबत पर्यटक गोंधळात पडतात व आपली वाहने नाक्यावर थांबवून विचारपूस करतात. यावेळी वाहतूक कोंडी झाल्यावर पर्यटकांना नाहक स्थानिक नागरिक व वाहनचालकांचे बोलणे ऐकून घ्यावे लागते. काही पर्यटकांना बाजारपेठेकडे जायचा मार्ग न समजल्याने दुसऱ्या ‘नो एंट्री’ असलेल्या रस्त्यावर वाहन नेल्यास त्यांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईचाही सामना करावा लागतो, असे अंधारी यांनी म्हटले आहे.
--
पालिकेने बसविलेला फलक गायब
भरड नाका येथे दिशादर्शक फलकाअभावी पर्यटकांची वाहने खोळंबत असल्याने वाहतूक नियंत्रण करण्यास पोलिस यंत्रणाही कमी पडत आहे. पोलिस वाहतूक शाखेचे एकच पोलिस कर्मचारी भरड नाका व शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना तोकडे पडत आहेत. काही वर्षांपूर्वी मालवण लायन्स क्लबने भरड नाक्यावर दिशादर्शक फलक बसवला होता; मात्र त्याठिकाणी हायमास्ट टॉवर उभारताना तो फलक काढून टाकला. त्यानंतर पालिकेने बसविलेला फलक इतर बॅनरमुळे गायब झाला आहे. त्यामुळे पालिकेने दिशादर्शक फलकाच्या आड येणारे बॅनर हटविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणीही श्री. अंधारी यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT