Kankavli Nagar Panchayat  esakal
कोकण

Kankavli Nagar Panchayat : कणकवलीतील 'इतक्या' इमारती बनल्या धोकादायक; नगरपंचायतीने मालकांना धाडली नोटीस

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात धोकादायक घरे, इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी येथील नगरपंचायतीने शहरातील २८ इमारत मालकांना नोटिसा बजावल्‍या आहेत.

कणकवली : सुरक्षिततेचा उपाय म्हणून येथील नगरपंचायतीने (Kankavli Nagar Panchayat) शहर हद्दीतील २८ धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावल्‍या आहेत. त्याचप्रमाणे ज्‍यांची घरे कमकुवत झाली असतील, त्‍यांनी पावसाळ्यापूर्वी घरांची डागडुजी करून घ्यावी. धोकादायक घरांबाबत सक्षम प्राधिकरणाकडून स्थलदर्शक तपासणी करून घेण्याचेही आवाहन केले आहे.

मॉन्सूनपूर्व (Pre-monsoon) कालावधीत वाहणारे जोरदार वारे तसेच पावसाळ्यात धोकादायक घरे, इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी येथील नगरपंचायतीने शहरातील २८ इमारत मालकांना नोटिसा बजावल्‍या आहेत. यात म्‍हटले आहे, की महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम १९६५ चे कलम १९५ (१) अन्वये नगरपंचायत हद्दीतील ज्‍या मिळकत धारकांच्या घरांचा कोणताही भाग धोकादायक स्थितीत पडावयास झालेला असल्यास तो भाग त्वरित नगर पंचायतीच्या रीतसर पूर्वपरवानगीने काढून टाकावा.

जुन्या इमारतीची (Buildings) योग्य त्या सक्षम प्राधिकरणाकडून स्थलदर्शक तपासणी करून त्या प्राधिकरणाकडून सुचविलेल्या दुरुस्त्या कराव्यात. जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करावयाचे झाल्यास तसे नगरपंचायतीकडून रीतसर परवानगी घेऊन बांधकाम करावे. घरातील तसेच, अन्य रहिवाशांच्या जीविताचे रक्षण करावे. मोडकळीस आलेली इमारत असल्यास रस्त्याने येणाऱ्या - जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

महामार्गालगतची अर्धवट बांधकामे ‘जैसे थे’

महामार्ग चौपदरीकरणावेळी शहर हद्दीतील महामार्ग दुतर्फा काही बांधकामे अर्धवट तोडण्यात आली. या बांधकामांचा पूर्ण मोबदला संबधित हायवे बाधितांना देण्यातही आला. मात्र, अर्धवट तोडलेल्‍या इमारती अजूनही तशाच ठेवल्‍या आहेत. यात शहरातील मुख्य पटवर्धन चौकातील कॉम्प्लेक्‍ससह इतर इमारतींचाही समावेश आहे. या इमारती हटविण्याबाबत नगरपंचायतीने वारंवार नोटिसा बजावूनही त्‍या महामार्ग प्राधिकरण अथवा नगरपंचायतीने हटविलेल्‍या नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT