कोकण

मालवणात अनोळखीने मोटार फोडली

CD

83929
मालवण ः अनोळखीने काचा फोडून नुकसान केलेली मोटार.

मालवणात अनोळखीने मोटार फोडली
मालवण, ता. १५ : शहरातील वायरी मोरेश्वरवाडी येथील विठ्ठल ऊर्फ विश्वनाथ मालंडकर यांच्या मालकीच्या मारुती ओमनी कारची तोडफोड केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत मालंडकर यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तींच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. काही संशयित नावे मालंडकर यांनी पोलिसांना दिली असून त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आबा मालंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आपल्या मालिकीची मारुती ओमनी (एम. एच. ०७ एच- ११७३) ही नादुरुस्त असल्याने घरापासून काही अंतरावर पुलाजवळ एका बाजूला उभी केली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोटारीची समोरील काच तसेच हेडलाईट फोडून नुकसान केले आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT