कोकण

-नदीतील गाळ काढण्यास प्राधान्य द्या

CD

७ (टुडे पान १ साठी)


-rat१६p२५.jpg-
P२४M८४०२२
रत्नागिरी ः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आदी.
-----------

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बैठक...लोगो

नदीतील गाळ काढण्यास प्राधान्य द्या

एम. देवेंदर सिंह ; जुन्या इमारती, पूल, शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता.१६ : पाटबंधारे विभागाने नदीपात्रातील गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे. जुन्या इमारती, पूल, शाळा यांचे संबंधित विभागांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावे. सर्वच विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे २० मे पर्यंत पाठवावेत, असे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सूनपूर्व तयारी २०२४ आढावा बैठक आज घेण्यात आली. बैठकीला पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, विविध विभागांचे प्रमुख, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. विभागनिहाय आढावा घेतल्यानतंर जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली सुरू असल्याबाबत गटविकास अधिकारी, पालिकांचे मुख्याधिकारी यांनी तपासून खात्री करावी. प्रत्येक तहसीलदारांकडे सॅटेलाईट फोनचे वितरण करा. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची तयारी ठेवावी. तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्याकडील असणारी साधनसामुग्री सुस्थितीत आहे का? याची तपासून खात्री करावी.
पाटबंधारे विभागाने नद्यांमधील विशेषत: शहरालगतच्या भागातील गाळ काढण्याचे काम अधिक सक्रिय आणि प्राधान्याने करावे. धोकादायक ठिकाणी इशारे देणारे फलक उभारावेत. नगरपालिकांनी आपल्या हद्दीतील जुन्या इमारतींचे ऑडिट करावे. पूर नियंत्रण आराखड्याबरोबरच स्थलांतराचा आराखडाही तयार ठेवावा. महावितरणने जीर्ण खांब बदलावेत, धोकादायक झाडांच्या फांद्या तोडणे, जलद कृती पथक तयार करणे आदी कामे करावीत. लोटे एमआयडीसी असोसिएशनची बैठक घेऊन सतर्क करावे. शिक्षण विभागाने धोकादायक शाळा, छत दुरुस्ती आदींबाबतची कामे करावीत, अशा सूचना सिंह यांनी दिल्या.
------------------
चौकट-
१५.२० लक्ष घन मीटर गाळ उपसा
चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतून १० लाख ४९ हजार घमी व शिवनदीतून नाम फाउंडेशनमार्फत शिवनदीतून ४ लाख २ हजार २२२ घमी, असा एकूण १५.२० लक्ष गाळ काढण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी दिली.
----
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
* सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली सुरू करा
* प्रत्येक तहसीलदरांकडे सॅटेलाईट फोन
* कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची तयारी ठेवावी
* तालुकास्तरीय यंत्रणेने आपली साधनसामुग्री सुस्थिती ठेवावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT