कोकण

मध्यवर्ती बसस्थानकावर ७ वर्षांनी पहिला स्लॅब

CD

३९ (पान ३ साठी)

-rat१६p४४.jpg-
२४M८४१००
रत्नागिरी ः मध्यवर्ती बस स्थानकाच्या इमारतीचे काम सात वर्षांनी स्लॅबपर्यंत आले.
-rat१६p४५.jpg-
२४M८४१०१
प्रगतिपथावर असलेले काम.
-----------
बसस्थानकावर ७ वर्षांनी पहिला स्लॅब

१८ कोटीचे काम प्रगतीपथावर ; मंत्री सामंत यांचा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : येथील मध्यवर्ती एसटी बस स्थानकाच्या रखडलेल्या इमारतीचा पहिला स्लॅब सात वर्षांनी पडणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नेमणूक करण्यात आलेले ठेकेदार मे. टेक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने फेब्रुवारी २०२४ पासून कामाला गती दिल्याने हे चित्र आहे. उद्योगमंत्री उदय सामंत देखील याचा पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे लवकर बसस्थानकाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
राज्य परिवहन मध्यवर्ती रत्नागिरी बसस्थानकाचे पुनःर्बांधणीचे काम राज्य परिवहन महामंडळामार्फत शासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या निधीतून सुरू होते. पूर्वीच्या कंत्राटदारांकडून हे काम सुरवातीला जोरदार करण्यात आले होते. त्या ठेकेदाराला हे काम न परवडणारे असल्याने त्याने काम रखडवले. अखेर त्याचा ठेका रद्द करण्यात आला. दरम्यानच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. करारानुसार रत्नागिरी बसस्थानक पुनःर्बांधणीचे उर्वरित काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नेमणूक करण्यात आलेले मक्तेदार टेक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून फेब्रुवारी २०२४ पासून प्रगतिपथावर आहे. १० कोटीवरून आता हे काम १८ कोटीवर गेले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत याला निधी दिला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT