कोकण

काळबादेवी खाडीपुलासाठीच्या निविदा उघडल्या

CD

४० (पान ३ साठी)
-----------

खाडीपुलासाठीच्या निविदा उघडल्या

सागरी महामार्गाला वेग ; बांधकामासाठी दोन कंपन्या इच्छूक

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : कोकणातून जाणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी मार्गावरील प्रमुख दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तांत्रिक निविदा उघडल्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी खाडी येथील पुलाचा समावेश आहे. १.८ किमीच्या या पुलामुळे गणपतीपुळे रत्नागिरी हे अंतरही कमी होणार आहे. दोन कंपन्यांनी या पुलाच्या कामासाठी स्वारस्य दाखविले आहे.
जिल्ह्यातील रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील काळबादेवी खाडी येथे मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी तांत्रिक निविदा उघडल्या आहेत. या पुलाचा कच्चा आराखडा बनविण्यात आला आहे. हा सागरी पूल १.६ किलोमीटर एवढ्या लांबीचे आहे. या सागरी महामार्गामुळे कुणकेश्वर मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे. या पुलाशिवाय या सागरी महामार्गावर खालील ५ पुलांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या सर्व पुलांसाठी ३ हजार १०५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. रेवस रेडी हा सागरी महामार्ग कोकणातील किनाऱ्यालगतच्या अरुंद गावठाणातून जाणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून हा सागरी मार्ग जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस सागरी मार्गाची सुरवात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होणार आहे.
-----------------
...असे आहेत सागरी मार्गावरील पूल

कुंडलिका खाडीवरील रेवदंडा- सालाव ः ३.८ किमी
बाणकोट खाडीवर कोलमांडिया- वेश्वी ः १.७ किमी
दापोली‚ गुहागर दाभोळ खाडीवर ः २.९ किमी
जयगड खाडीवर तवसाळ -जयगड ः ४.४ किमी
काळबादेवी खाडीवरील पूल, रत्नागिरी ः १.८ किमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT