कोकण

चिपळूण ः रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला मिळाला मुहुर्त

CD

rat1p6.jpg -
87164
चिपळूण ः उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम.

उड्डाणपुलाच्या कामाला मिळाला मुहूर्त

चिपळुणातील महामार्ग; दोन रिग मशिनद्वारे पिलरसाठी उत्खनन

चिपळूण, ता. १ : रखडलेल्या बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामास सुरवात झाली आहे. दोन रिग मशिनद्वारे पिलर उभारण्यासाठी उत्खनन केले जात असून, पुन्हा एकदा या कामाला वेग आला आहे. या कामासाठी डिसेंबर-२०२५ पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यातही शक्य तितके काम सुरू ठेवले जाणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होता होईना. आतापर्यंत या कामाला तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली; परंतु तोही कालावधी आता कमी पडू लागला आहे. चिपळूणच्या सर्वाधिक १८०० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचेही काम रखडले आहे. या पुलाच्या कामाला डिसेंबर-२०२३ पर्यंत अंतिम मुदत होती; परंतु ऑक्टोबर-२०२३ मध्ये काम सुरू असतानाच पुलाचा काही भाग कोसळला. शहरातील बहादूर शेख नाका येथे ही घटना घडली होती. त्यानंतर पुलाचे काम थांबवण्यात आले होते. उड्डाणपुलाच्या पहिल्या डिझाईननुसार ४० मीटरवर पिलर उभारण्यात आले होते. पिलरचे काम अंतिम टप्प्यात होते, तसेच त्यासाठी लागणारे गर्डरही पूर्णतः तयार झाले होते. अशातच दुर्घटना घडली आणि या उड्डाणपुलाचे काम थांबले; मात्र बहादूर शेख नाका येथे वळणावरून हा पूल जात असल्याने डिझाईनमध्ये बदल करण्यात आला. नव्या डिझाईनला तब्बल सहा-सात महिन्यांनंतर मंजुरी मिळाली. नव्या डिझाईननुसार दोन पिलरमधील गाळ्याचे अंतर २० मीटर राहणार आहे. प्रत्येक २० मीटरवर एक पिलर उभारण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या उड्डाणपुलासाठी नव्याने पिलर उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अतिथी हॉटेलच्या समोर खोदाईला सुरवातदेखील झाली. दोन रिग मशिन आणून उत्खनन सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढ्या खोदाईवर भर दिला जाणार आहे, तर उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेले गर्डर पुन्हा नव्याने केले जाणार असून, त्यासाठी कळंबस्ते येथे प्लांट उभारण्यात आला आहे.
----------------------
कोट
उड्डाणपुलाचे काम ईगल कंपनीच करत आहे. केवळ पोटठेकेदार बदलला आहे. नव्या डिझाईनप्रमाणे काम सुरू झाले असून, कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर-२०२५ पर्यंत हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. उड्डाणपूल कोसळल्यानंतर तयार केलेले पहिले गर्डर आणि पॅन नष्ट करावे लागल्याने ठेकेदाराचेही मोठे नुकसान झाले. नव्या डिझाईननुसार खर्च वाढणार असला तरी तो संबंधित ठेकेदरास पेलावा लागणार आहे. शासनाकडून उड्डाणपुलासाठी नव्याने वाढीव खर्च केला जाणार आहे.
- आर. पी. कुलकर्णी, जिल्हा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT