कोकण

राजापूरला होळकर जयंती साजरी

CD

राजापूरला होळकर
जयंती साजरी
राजापूरः राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राजापूर तालुका धनगर समाजातर्फे साजरी करण्यात आली. दीपप्रज्वलन, राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. या वेळी आमदार राजन साळवी, भाजपचे नेते महादेव गोठणकर, माजी सभापती अभिजित तेली, तुकाराम बावदाने, प्रकाश झोरे, संतोष हातणकर, गुरूनाथ बावदाने, संजय भोजे, गंगाराम शेळके, साईल कोकरे, सुनील काळे, पर्शुराम नागरेकर, ताई झोरे आदी उपस्थित होते.
--------------
फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर
संघटनेची कार्यशाळा
राजापूरः रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ येथे कार्यशाळा झाली. कार्यशाळांमध्ये फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांना या व्यावसायिक क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान मिळावे आणि त्या द्वारे त्यांचे व्यावसायिक कौशल्य अधिक विकसित व्हावे या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले. वेडिंग फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, सिनेमॅटिक आदी संबंधित मार्गदर्शन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, कार्याध्यक्ष गुरू चौगुले, सचिव प्रवीण पाटोळे, खजिनदार सुरेंद्र गीते, जिल्हा संघटक संदेश टिळेकर यांच्यासह जिल्हाभरातील मोठ्या संख्येने फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर या कार्यशाळांना उपस्थित होते.
---------------
गुहागर आगार
वर्धापन साजरा
गुहागर ः लालपरी अर्थातच एसटीच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त गुहागर आगारांमध्ये केक कापून आणि लालपरीचे पूजन करून वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. या वेळी गुहागर आगार व्यवस्थापिका सोनाली कांबळे, अधिकारी कर्मचारी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी व इतर प्रवासी उपस्थित होते. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, महाराष्ट्राच्या विकासात सिंहाचा वाटा असलेली लाडक्या लालपरीचा ७६वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT