कोकण

तहान लघुपटाला राजर्षी पुरस्कार

CD

तहान लघुपटाला
राजर्षी पुरस्कार
साडवलीः पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर आधारित तहान या लघुपटाला तब्बल १०० लघुपटातून मानाचा राजर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. या लघुपटातून पाण्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये कडवईतील एक हरहुन्नरी कलाकार डॉ. भगवान नारकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या लघुपटाला यापूर्वी देखील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राजर्षी पुरस्काराने त्यामध्ये मानाचा तुरा खोवण्याचे काम केले आहे. लघुपटाचा आशय, विषय आणि दर्जा पाहून या लघुपटाची उत्कृष्ट लघुपट म्हणून निवड करण्यात आली. ९ जूनला हा पुरस्कार कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदान केला जाणार आहे.
-----
भावना दुखावणारे
संदेश नकोत
पावसः लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६ जूनपर्यंत आचारसंहिता लागू आहे. निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. ४) जाहीर होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही सोशल मीडियाद्वारे फेसबूक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम अॅप्लीकेशनच्या किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज, स्टोरी, स्टेटस्, डिजिटल बॅनर माध्यमाद्वारे करू नयेत. कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नयेत. डीजे वाजवणे, फटाके फोडणे हे उपक्रमही कोणी करू नयेत. तसेच विजयी मिरवणूक विनापरवाना काढू नये. व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी ६ जुनपर्यंत ग्रुपच्या सेटिंगमध्ये ओन्ली अॅडमीन करून बदल करून घ्यावा. जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट टाकणार नाही. अॅडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पूर्णगड पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.
------
ताम्हाने हायस्कूलला
५ संगणक संचांची भेट
साडवली ः देवरूखमधील एका दानशूर व्यक्तीने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ५ संगणक संच ताम्हाने माध्यमिक विद्यामंदिरला
भेट स्वरुपात दिले आहेत. संचांची संस्थाध्यक्ष अशोक सप्रे, उपाध्यक्ष अनंत कुळये, सचिव पप्पु गोवळकर, मुख्याध्यापक मारुती चोरमाले यांच्या उपस्थितीत चाचणी घेण्यात आली. दानशूर व्यक्तीचे अध्यक्ष अशोक सप्रे यानी आभार मानले असून १५ जूनपासून पाचवी ते दहावीमधील सर्व विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती सप्रे यांनी दिली.
-----------
कोकणातील लोककला
प्रकारांवर परिसंवाद
चिपळूण ः संस्कारभारती कोकण प्रांत आणि लोकायन सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि बहुउद्देशीय संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील प्रयोगात्म लोककलांचा परिसंवाद ८ आणि ९ जूनला सायंकाळी ७ ते ९ या कालावधीत झुमच्या माध्यमाने ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात भरतमुनी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लोककलाकार गणपत सखाराम मसगे हे ठाकर लोककला प्रकारात कळसुत्री बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, कळबाहुली, पोवाडा, फुगडी, डोनागीत, पांगुळ बैल, गोंधळ, पोत, राधा नृत्य, पिंगळी या बारा लोककला प्रकारांवर प्रकाश टाकणार आहेत. शंकर मेस्त्री दशावतार नाट्यप्रकार आणि प्रा. डॉ. सूर्यकांत आजगावकर हे नमन खेळे या प्रकारावर मार्गदर्शन करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT