कोकण

मळेवाड ग्रामपंचायतीतर्फे विद्यार्थ्यांना घरपोच दाखले

CD

87586

मळेवाड ग्रामपंचायतीतर्फे
विद्यार्थ्यांना घरपोच दाखले

सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. ३ ः येथील दाखला शिबिराला तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी मळेवाड येथील सुदर्शन सभागृहामध्ये ‘दाखला आपल्या दारी’ शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिराला सावंतवाडी तहसीलदार पाटील यांनी भेट देत शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत घेतलेल्या या शिबिराचे कौतुक केले. हे शिबिर मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने आयोजित करण्यात आले. लाभधारक विद्यार्थ्यांना दाखले घरपोच देण्याची व्यवस्था उपसरपंच मराठे यांच्या माध्यमातून केली आहे. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचला असून, तत्काळ दाखले मिळणार असल्याने ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत उपसरपंच मराठे यांचे विशेष आभार मानले. या शिबिराला मुळेवाड तलाठी अनुजा भास्कर व आजगाव मंडळ अधिकारी कोदे, सावंतवाडी तहसील कार्यालयातील सेतूचालक आकाश मिसाळ व त्यांचे कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT