कोकण

‘परुळे बाजार’च्या प्रकल्पांचे चित्रीकरण

CD

87626

‘परुळे बाजार’च्या प्रकल्पांचे चित्रीकरण

केंद्राकडून बहुमान ः प्रेमा जाधव यांच्या कामाची दखल

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३ ः परुळे बाजार ग्रामपंचायत येथे दिल्ली येथून आलेल्या केंद्राच्या टिमने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत प्रेमा जाधव यांनी ग्रामपंचायत परुळेबाजार कार्यक्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामाचे चित्रीकरण केले.
केंद्राच्या माध्यमातून चित्रीकरणासाठी टीम परुळेबाजार येथे दाखल झाली होती. यथार्थ साहू, मोहम्मद हमजा, ऋषी व्यास, विश्वनाथ पेंडूरकर यांनी सहभाग घेतला. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्रवीण कानकेकर हे उपस्थित होते. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप प्रभू, सुनाद राऊळ, तन्वी दुधवडकर, पूनम परुळेकर, सीमा सावंत, प्राजक्ता पाटकर, नमिता परुळेकर, अभय परुळेकर, ग्रामसेवक शरद शिंदे यांसह आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते. या टिमने वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन, गांडूळ खत प्रकल्प, शोष खड्डा, काथ्या प्रकल्प युनिट, कचरा गोळा करून नेणारी घंटागाडी आदी विविध प्रकल्पांतील कामकाजाचे चित्रीकरण केले. तसेच उपस्थित स्वच्छाग्रहींच्या मुलाखती घेतल्या. यापूर्वी परुळेबाजारच्या स्वच्छाग्रही प्रेमा जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्राच्या ग्रामपाणी स्वच्छता विभागाच्या जलशक्ती विभागाचे मंत्री राजेंद्रसिंह शेखावत यांनी त्यांची स्वत: मुलाखत घेतली होती. याचाच एक भाग म्हणून स्वच्छाग्रहीच्या गावात जाऊन त्यांनी काम केलेल्या प्रकल्पांचे प्रत्यक्ष चित्रीकरण केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मिशनसाठी उत्तम पद्धतीने तयारी केली होती. सर्व घटकांनी योग्य सहकार्य केले. याबद्दल केंद्राच्या टिमने अभिनंदन केले. देशातील प्रत्येक राज्यातून काही गावांची निवड केली आहे. त्यात परुळे बाजारचा समावेश आहे. त्यामुळे परुळेला हा देश पातळीवरील मिळालेला एक बहुमान समजला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT