कोकण

-तटकरे यांचा विजयाचा मंडणगडमध्ये जल्लोष

CD

२४ (पान ५ साठी)

-rat४p३५.jpg-
OP२४M८७९३५
मंडणगड : शहरातील मुख्य चौकात विजयोत्सव साजरा करताना महायुतीचे तीनही घटक पक्षांचे कार्यकर्ते.
----------

तटकरेंच्या विजयाचा मंडणगडमध्ये जल्लोष

मंडणगड, ता. ४ ः महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या विजयामुळे आनंदीत झालेल्या महायुतीच्या तिनही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मंडणगड शहरातील मुख्य नाक्यात विजयोत्सव फटाके फोडून साजरा केला. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वैभव कोकाटे, दीपक मालुसरे, हरेश मर्चंडे, नीलेश गोवळे, अनंत शिंदे, इरफान बुरोंडकर, संतोष पार्टे, चेतन सातोपे, भाई मालगुंडकर, अनंत शिंदे, यश मेहता, मुकेश तलार, मंगेश लाखण, प्रतीक पोतनीस, प्रवीण कदम, गिरीश जोशी,यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगड लोकसभा मतदान क्षेत्रात विजयाचा गुलाल कोण उडवणार या विषयी गेल्या महिन्याभरापासून उत्सुकता होती. त्यातही महाविकास आघाडीने तटकरे यांच्यासमोर अनंत गीते यांचे आव्हान होते. महाविकास आघाडीस राज्यात मोठे यश मिळालेले असताना विजयाचा फॉर्म्युला रायगडमध्ये यशस्वी झाला नाही. खासदार तटकरे यांनी सलग दुसऱ्यावेळी नव्या सवंगड्यांसह ५ लाख ८ हजार ३५२ इतकी मते मिळवली. ८२ हजार ७६४ इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडून आले. निवडणुकांच्या कालावधीत महाविकास आघाडीच्यावतीने मांडण्यात आलेल्या सर्व गणितांना मोडून काढत सुनील तटकरे यांनी विजयश्री संपादित करताना एका अर्थाने आपल्या पक्षाची आबही राखली.
-----
कोट
खासदार सुनील तटकरे यांचा हा विजय म्हणजे जनतेने चांगल्या कामाला आणि विकासाला दिलेले मत आहे. मतदार संघात त्यांच्या प्रामाणिकपणावर जनतेने विश्वास ठेवत पुन्हा एकदा खासदार म्हणून विराजमान केले आहे.

- मुझफ्फर मुकादम, तालुकाध्यक्ष, मंडणगड राष्ट्रवादी काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT