कोकण

रत्नागिरी-अभ्यंकर कनिष्ठ महाविद्यालयात गुणगौरव

CD

rat४p३६.jpg-
२४M८७९३६
रत्नागिरी : बारावीमध्ये यश मिळवणारे अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी. सोबत पुढे बसलेले प्राचार्य, प्राध्यापक.

‘अभ्यंकर’ महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम

डॉ. साखळकर ः विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाने कोकण विभागात उज्ज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. याचे सर्व श्रेय सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना जाते, असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी काढले. बारावी उत्तीर्ण झाल्यावर पुढील अभ्यासक्रमासाठी गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांची माहिती देखील देत, अशा संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनदेखील केले.
अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक शाखेमध्ये पहिल्या तीन क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कला शाखेमध्ये संचिता लिंगायत, पूजा कानिटकर आणि स्वरांगी जायदे, वाणिज्य शाखेमध्ये तृषा चितळे, श्रावणी उकिडवे आणि रिया भुर्के, विज्ञान शाखेमध्ये ओंकार घडशी, धनिष्ठा शेवडे आणि श्रेया कदम, एमसीव्हीसी शाखेमध्ये समृद्धी हरळीकर, कश्मिरा पुसाळकर आणि सार्थक सावंत या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या वर्षी संस्कृत विषयामध्ये नऊ, गणित विषयामध्ये एकूण तीन तसेच अकाउंटन्सी आणि मानसशास्त्र विषयांमध्ये प्रत्येकी एका विद्यार्थ्याने पैकीच्या पैकी गुण मिळवले. या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अथर्व भिडे या माजी विद्यार्थ्याचा विशेष सत्कारदेखील करण्यात आला. भिडे याने नुकतीच आयसर (पुणे) येथून गणित विषयात बीएसएमएस एसएमएस ही पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त करून सर्व विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT