कोकण

राणेंच्या विजयाने चिपळुणात जल्लोष

CD

-ratchl५१.jpg-
P२४M८८१२५
चिपळूण ः नारायण राणे यांच्या विजयानंतर पेढा भरवताना महायुतीचे कार्यकर्ते.
------------

राणेंच्या विजयाने चिपळुणात जल्लोष

चिपळूण, ता. ५ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी चांगल्या मताधिक्याने विजय संपादन केला. या पार्श्वभूमीवर चिपळूणात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
सुरवातीपासूनच्या मतमोजणी फेरीपासून एखाददुसरी फेरी वगळता महायुतीचे उमेदवार नारायण राणे आघाडीवर राहिले. फेरीनिहाय मते पाहता महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारत होता. दुसरीकडे चिपळूणमध्ये खेर्डीत व आमदार शेखर निकम यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केला. या वेळी खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीलेश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, खेर्डी ग्रामपंचायत सदस्य अभिजित खताते, रूपेश इंगवले, खांदाटपालीचे उपसरपंच सचिन गमरे आदी उपस्थित होते.
चिंचनाका येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या वेळी माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, भाजपा महिला मोर्चा चिपळूण शहराध्यक्ष शीतल रानडे, माजी नगरसेविका नुपूर बाचिम, उल्हास भोसले, अमित चिपळूणकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT