कोकण

अनघा उकसकरला अमेरिकेचा पुरस्कार

CD

अनघा उकसकरला
अमेरिकेचा पुरस्कार
गावतळे ः दापोली तालुक्यातील कोळबांद्रे गावची सुकन्या युवा कवयित्री अनघा उकसकर हिला अमेरिकेचा एमिली डिकिन्सन पुरस्कार प्राप्त झाला. कोळबांद्रे शाळेत असतानाच तिने कविता लिहायला सुरवात केली. विविध विषयांवर तिने असंख्य कविता केल्या असून तिने २१व्या वर्षी २१ दिवसात २१ कविता लिहून अमेरिकेतील एमिली डिकिन्सन हा पुरस्कार प्राप्त केला.
---------
खल्वायनची ८ ला
मासिक संगीत सभा
रत्नागिरीः येथील खल्वायन रत्नागिरी संस्थेची मासिक संगीतसभा शनिवारी (ता. ८) सायंकाळी सात ते नऊ या वेळात गोदुताई जांभेकर विद्यालयात होणार आहे. (कै.) डॉ. आशुतोष मुळ्ये स्मृती संगीतमैफल रत्नागिरीतील सुप्रसिद्ध आघाडीचे युवा गायक श्रीधर पाटणकर यांच्या शास्त्रीय तसेच अभंग नाट्यगीताने रंगणार आहे. ही मैफल विनामूल्य असून, रत्नागिरीतील संगीतप्रेमींनी मैफलीला उपस्थित राहावे, असे आवाहन खल्वायन संस्थेने केले आहे.
---------------
कर्मवीर इदातेंचा
अमृत महोत्सव
दाभोळ ः पद्यश्री कर्मवीर दादासाहेब इदाते यांचा २३ जूनला ७५वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने जालगाव येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे सकाळी १०.३० वा. जालगांव येथील श्रीशैल सभागृहात अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. या अभिष्टचिंतन कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच संस्था व पाच व्यक्ती यांना पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते सामाजिक समरसता प्रेरणा पुरस्कार तसेच पद्मश्री कर्मवीर दादासाहेब इदाते यांचे जीवनचरित्र समरसतेचा वारकरी या पुस्तकाचे प्रकाशन माजी राज्यपाल पद्मभूषण राम नाईक व राष्ट्रसंत डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संस्थेतर्फे वर्षभर सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
----
दापोलीतील १५ गावांची
टॅंकरची मागणी
दाभोळ ः दापोली तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा बसत असून १५ गावांकडून पंचायत समितीकडे पाणी टँकरची मागणी करण्यात आली आहे. दापोलीत टंचाईग्रस्त गावे अधिक असून, पाणीपुरवठा करणारा टँकर एकच असल्याने पाणीपुरवठा करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT