कोकण

शेळीपालन करणाऱ्या कोमलचे दहावीत सुयश

CD

शेळीपालन करणाऱ्या कोमलचे दहावीत यश

सकाळ वृत्तसेवा

खेड, ता. ५ : आर्थिक दुर्बलता पाचवीला पुजलेली असतानाही सदैव जगण्याची जिद्द बाळगून इतिहास घडविणारे थोडेच असतात. त्यापैकीच एक असलेली कोमल देवळेकर या खवटी येथील मुलीने दहावीत ८०.४० टक्के गुण मिळवून चमक दाखवली. कोणत्याही प्रकारची विशेष शिकवणी नाही. घरी आईला मदत करून शेळीपालन करणाऱ्या कोमलने आयुष्यात खूप शिकून यशस्वी होण्याची जिद्द मनी बाळगली आहे. खवटी गावातील विजय देवळेकर यांची ती कन्या होय. गवंडीकाम करून कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या विजय यांचा कामावर असताना छोटा अपघात झाला. या अपघातात पायाला गंभीर दुखापत होऊन ४० टक्के अपंगत्व आले. कोमलचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण खवटी शाळेत झाले. पुढील शिक्षण तिने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेतले. शिक्षकांचे मार्गदर्शन व त्यांनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन हा मूलमंत्र घेऊन कोमल आपली शैक्षणिक वाटचाल करत आहे. तिला उच्च शिक्षण घेतानाच प्रोफेशनल ब्युटीशियन कौशल्य प्राप्त करायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT