कोकण

जीवन आनंद संस्थेतील गरजूंना कपडे

CD

- rat५p२०.jpg-
२४M८८१४३
कुडाळ ः रोटरी क्लब ऑफ आणि अॅड. कल्पलता भिडे यांच्या संयुक्त जीवन आनंद संस्थेतील गरजूंना कपडे वितरित करण्यात आले.
-------------
रोटरी, कल्पलता भिडेंकडून
जीवन आनंद संस्थेतील गरजूंना कपडे

रत्नागिरी, ता. ५ ः रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि अॅड. कल्पलता भिडे यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील जीवन आनंद संस्थेतील गरजू लोकांना एक टेम्पो भरून कपडे वितरित करण्यात आले आहेत. रोटरी क्लबतर्फे ज्येष्ठ सदस्य धरमसी काका चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोटरी सदस्य तसेच काकांच्या मित्रपरिवाराने जुने पण सुस्थितीतील कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून या संस्थेला दिले. दरवर्षी धरमसी काका आणि अॅड. भिडे अशाप्रकारे वर्षभर लोकांकडून कपडे गोळा करून जीवन आनंद या संस्थेला देतात. या कार्यक्रमावेळी रोटरी अध्यक्ष श्रीकांत भुर्के आणि सचिव प्रमोद कुलकर्णी हे उपस्थित होते तसेच संस्थेतर्फे प्रसिद्धीप्रमुख महाबळेश्वर कामत आणि अमर पाडावे हे उपस्थित होते. संस्थेमध्ये सुमारे दोनशेहून अधिक मनोरुग्ण आणि गरजू आहेत. या कार्यात रत्नागिरीतील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यांचे रोटरीतर्फे अध्यक्षांनी आभार मानले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT