कोकण

वेंगुर्लेत पर्यावरणदिनी वृक्ष लागवड

CD

88190

वेंगुर्लेत पर्यावरणदिनी वृक्ष लागवड

पालिकेचा पुढाकार ः सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ ः हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, वृक्षतोड, प्लास्टिकचा अतिवापर आणि जैवविविधतेचा ऱ्हास याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे आज सायकल रॅलीसह शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळी नगरपरिषद कार्यालय ते दाभोली नाका, शिरोडा नाका, बॅ. नाथ पै रोड, पॉवर हाऊस, कॅम्प, म्हाडा वसाहत, जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत सायकलींवर पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीपर संदेश लिहिलेले फलक लावले होते. त्यानंतर गोळीबार मैदान येथे देशी प्रजातींच्या अंदाजे १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, वेंगुर्ले सायकल ग्रुप वेंगा बॉईजचे डॉ. प्रल्हाद मणचेकर, नित्यानंद आठलेकर, विश्राम घाडी, संदीप परब यांच्यासह नागरिक, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना झाडाचे रोप भेट देण्यात आले.
या कार्यक्रमानंतर बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेसमोर पर्यावरण बदलाविषयी विविध घटकांवर माहिती देणारे तसेच प्लास्टिक बंदी, प्लास्टिकच्या अतिवापराचे दुष्परिणाम, कांदळवन संवर्धनाचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर केले. उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा’बाबत शपथ घेतली. शहरातील विविध भागात ५०० वृक्षांची लागवड करण्याचे नियोजित आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी, असे आवाहन मुख्याधिकारी कंकाळ यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT