कुडाळ, ता. ५ ः भारतातील नवीनतम विमानसेवा ‘फ्लाय ९१’ ने जळगावमध्ये आपल्या ऑपरेशन्सचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. २४ मेपासून जळगाव (जेएलजी) आणि पुणे (पीएनक्यू) दरम्यान आठवड्यातून चार वेळा व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.
जळगाव-गोवा-जळगाव अशा विमान फेऱ्या असणार आहेत. यामुळे लगतच्या सिंधुदुर्गातील थेट जळगावला जाणाऱ्या प्रवाशांना हा पर्याय खुला झाल्याची माहिती ‘फ्लाय ९१’चे एम. डी. आणि सी. ई. ओ. मनोज चाको यांनी दिली.
‘फ्लाय ९१’ या नव्या विमानसेवेचा गोव्यातही विस्तार सुरू आहे. सिंधुदुर्गातील अनेक प्रवासी विमानसेवेसाठी गोव्यावर अवलंबून आहेत. त्यांना हा एक पर्याय खुला झाला आहे. या पार्श्वभूमिवर श्री. चाको यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘हा नवीन मार्ग प्रवाशांना नवा पर्याय खुला करणारा ठरला आहे. यातून गोव्यातून थेट जळगावशी हवाई संपर्क तयार होईल. ‘फ्लाय ९१’ने २४ मेपासून जळगाव-गोवा-जळगाव सेक्टरवरील विमानसेवेच्या संख्येत वाढ केली आहे. ही एअरलाईन आता गोव्याचे सुंदर किनारे आणि जळगावचा वारसा अनुभवण्यास दररोज कनेक्टिव्हिटी ऑफर करेल.
पुणे हे ‘फ्लाय ९१’ नेटवर्कवरील सातवे देशांतर्गत गंतव्यस्थान आहे. एक अग्रगण्य प्रादेशिक वाहक म्हणून ‘फ्लाय ९१’ येथे देशातील कमी सेवा असलेल्या आणि सेवा न मिळालेल्या विमानतळांवर अखंड प्रवास अनुभव देण्यासाठी समर्पित आहोत.
पुणे आणि जळगाव दरम्यान उड्डाणे सुरू केल्याने आणि गोवा व जळगाव दरम्यान वाढलेल्या वारंवारतेमुळे आय.टी. कर्मचारी, व्यापार, पर्यटक आणि या स्थळांदरम्यान नियमितपणे प्रवास करणाऱ्यांना फायदा होईल.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘फ्लाय ९१ ही गोव्यातील एक प्रादेशिक विमान कंपनी आहे, ज्याचे लक्ष्य भारतातील लहान शहरांशी हवाई संपर्क सुधारण्याचे आहे. अनुभवी व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या ‘फ्लाय ९१’ची पुढील पाच वर्षांत ५० शहरांना जोडण्याची योजना आखत आहे. ते त्यांच्या ताफ्यात ३० विमाने जोडतील, जी देशभरातील विविध केंद्रांवर असतील.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.