कोकण

पत्नी, प्रियकराने केला पतीचा केला खून

CD

प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
खेडमधील दोघांना अटक ः देवघरमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले
सकाळ वृत्तसेवा ः
गुहागर, ता. ५ ः तालुक्यातील देवघर येथील नदीकिनारी सडलेल्या अवस्थेत सापडलेला मृतेदह हा पत्नी आणि प्रियकराने केलेल्या खुनाचाच प्रकार असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. शनिवारी (ता. १) गणेश माने यांचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी गणेशची पत्नी जयश्री माने (वय ३७) आणि प्रदीप सीताराम कदम (४२, रा. खेड) या संशयितांना गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. गणेश यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथील गणेश शिवराम माने याची सासूरवाडी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे-गोपाळवाडी येथील होती. १ मे रोजी गणेश माने याचा मृतदेह देवघर येथील नदीकिनारी आढळला होता. सडलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पाठवले होते. गणेशच्या डोक्याच्या मागील व पुढील भागावर कवटीला मार बसल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळे हा घातपातच असल्याचे गुहागर पोलिसांनी हेरले. गेली तीन दिवस याप्रकरणी गुहागर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवून गणेशची पत्नी व तिचा प्रियकराला अटक केली. गणेश मानेच्या पत्नीचे कोरोना काळात खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथील घटस्फोटित वडापवाल्याशी सूत जुळले. गेली चार वर्षे सुरू असलेले हे प्रेमप्रकरण गणेश माने याला सात ते आठ महिन्यांपूर्वी कळले. यामुळे गणेश माने व त्याच्या पत्नीबरोबर कायम वाद सुरू झाला. शेवटी गणेशची पत्नी मार्गताम्हाणे येथील गोपाळवाडी येथे चार महिन्यांपूर्वी येऊन राहात होती. मात्र गणेश माने हा त्रास देत असल्याने अखेर त्याचा कायमचा काटा काढण्याचा त्याच्या पत्नीने व प्रियकराने ठरवले.
यासाठी १७ एप्रिलला पत्नीने मार्गताम्हाणे येथे गणेशला बोलावून घेतले. सायंकाळी ६ च्या सुमारास देवघर येथील नदीकिनारी बोलण्यासाठी घेऊन जाऊन दगडाने डोक्यावर मारहाण करत मृतदेह नदीपात्रात टाकून दिला. तो हरवल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानंतर १ जूनला गणेशचा मृतदेह देवघर येथील नदीकिनारी सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून २४ तासात गणेशची पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास गुहागर पोलिस निरीक्षक सचिन सावंत करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT