कोकण

विमानातून प्रवासाचे दिव्यांगांचे स्वप्न प्रत्यक्षात

CD

-rat७p१.jpg-
२४M८८५७८
रत्नागिरी ः विमानातून प्रवासात सहभागी रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग सभासद.
------------
दिव्यांगांचे विमानातून प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात

दुर्गाशक्ती, भुस्कुटे परिवाराचे सहकार्य ; जिल्ह्यातील नऊजणांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः आयुष्यात एकदातरी विमानातून प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकजण पाहतो; पण सर्वांच्याच नशिबी ते असतेच असे नाही. ज्यांना साधा प्रवास करतानाही अनेक अडचणी येतात अशा दिव्यांग बांधवांना विमान प्रवास म्हणजे दुरापास्तच. दुर्गाशक्ती सामाजिक चळवळ, अशोक भुस्कुटे परिवाराने विमानप्रवास सहल आयोजित केली होती.
अपंगांची काठी म्हणून दुर्गाशक्ती सामाजिक चळवळीचे अभिमानाने नाव घेतले जाते. सर्वदूर पसरलेल्या जिल्ह्यातील, जे स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाहीत अशा निवडक नऊ दिव्यांगांना यंदा मुंबई-हैदराबाद असा प्रवास घडवण्यात आला. जिल्ह्यातील मध्यवर्ती चिपळूणमधून रात्री १२ वा. टेम्पो ट्रॅव्हलरने व्हिलचेअर्ससह सकाळी ८ वा. मुंबई विमानतळ आणि ११ वा. विमान हैदराबादच्या दिशेने झेपावले. अवघ्या सव्वा तासात हैदराबाद विमानतळावर दाखल झाले. रात्रीच्या मुक्कामासाठी टॅक्सीने मुग्धा शाह यांच्या निवासस्थानी पोहचले. रात्री एकमेकांची ओळख व आयोजक दाम्पत्यापैकी अश्विनी भुस्कुटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी १ हजार ९६६ एकरात वसलेली रामोजी फिल्मसिटीतील भव्यदिव्य सेट्स बघून विशेषत: बाहुबलीचे सेट्स पाहून दिव्यांगांच्या डोळ्याचे पारणेच फिटले. परतीचा प्रवास रेल्वेतून करत या बांधवांनी रेल्वेप्रवासाचाही अनुभव घेतला. या सहलीत मुस्कान नाकाडे, अनिल रघुवीर, भागिरथी पाटील, पवन जाधव, विजया पटवर्धन, वर्षाराणी सावंत, नितीन जानस्कर, अजय नारकर, सिद्धार्थ तबीब या दिव्यांगांनी सहभाग घेतलेला होता. विमान प्रवासासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष दिनेश पोतनीस यांनी मदत केली. ही सहल यशस्वी होण्यासाठी अशोक भुस्कुटे, अश्विनी भुस्कुटे, समीर नाकाडे, मुग्धा शाह, दुर्गा, ओम यांनी विशेष परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT